घर सोडून आलेल्या २४ जणांना मिळाली पुन्हा मायेची ‘ऊब’

चाईल्ड लाईन आणि आरपीएफ पोलिसांची कामगिरी
24 children who left home RPF and Child Line Social Organization Handed over safely family solapur
24 children who left home RPF and Child Line Social Organization Handed over safely family solapuresakal

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील लोहमार्ग पोलीस, तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुरक्षा बल अर्थात (आरपीएफ) आणि चाईल्ड लाईन सामाजिक संस्थेच्या वतीने सर्वांनी समन्वय साधत हरविलेल्या व घर सोडून आलेल्या २४ मुलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूपपणे सुपूर्द केल्याने त्यांना पुन्हा मायेची ‘ऊब’ मिळाली आहे. कुटुंबीयांशी झालेला वाद शाहरा ओढ आदी कारणांमुळे मुले-मुली घरातून निघून येत असल्याचे समोर आले आहे. घरामध्ये झालेल्या वादातून रेल्वेने प्रवास करीत वेगवेगळ्या स्थानकांवर उतरतात. अशी संशास्पद मुले आढळून आल्यास स्थानकांवरील पोलिस, तिकीट तपासणीस, चाईल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून अशा मुलांची चौकशी करुन ताब्यात घेतले जाते.

यानंतर योग्य ती कार्यवाही करुन या मुला-मुलींना कुटुंबीयाकडे सुपूर्द केले जात असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे प्लॅटफॉर्म आणि रेल्वे परिसरातून पळून आलेल्या २४ मुलांची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे एकत्र आणण्यात आले आहे. हरविलेल्या किंवा घर सोडून आलेल्या मुलांमध्ये १५ मुले व ९ मुलींचा समावेश आहे. ही मुले आरपीएफ, तिकीट तपासणीस, कर्मचारी शासकीय रेल्वे पोलीस, चाईल्ड लाईन आणि प्रवाशांच्या मदतीने रेल्वे आणि प्लॅटफॉर्म तसेच रेल्वे परिसरात सापडली होती. या मुलांची त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा भेट झाल्याने त्यांना मायेची उब मिळाली आहे.

मध्य रेल्वेकडून प्रवाशांना व कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, रेल्वेत अथवा रेल्वे परिसरात आशा प्रकारची मुले आढळून आल्यास त्वरित चाईल्ड लाइन १०९८ वर संपर्क साधून हरविलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याकडे सुखरूपपणे सोडता येईल.

अशी आहे विभागनिहाय आकडेवारी

  • सोलापूर विभाग २४ मुले (१५ मुले व ९ मुली)

  • पुणे विभाग ७१ मुले (५० मुले व २१ मुली)

  • मुंबई विभाग २८५ मुले (२०६ मुले व ७९ मुली)

  • नागपूर विभाग ३२ मुले (१२ मुले व २० मुली)

  • भुसावळ विभाग ९२ मुले (४७ मुले व ४५ मुली)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com