
सोलापूर : घराकडे जाण्याच्या रस्त्यात थांबलेल्या तरुणांना जायला रस्ता सोडा म्हटल्याच्या कारणातून बाबा कादरी मशिदीजवळ सुमारे २५ जणांनी दगडफेक केली. त्यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. रात्री अटक केलेल्या अश्पाक जब्बार शेख याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला जामिनावर सोडले. उर्वरित चौघांना उद्या (मंगळवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.