Ayodhya Ram Mandir : आ. समाधान आवताडेच्या माध्यमातून 280 कार्यकर्ते अयोध्या दर्शनासाठी मार्गस्थ

आ. समाधान आवताडे यांच्या पुढाकारातून पंढरपूर- मंगळवेढा या मतदारसंघातील 280 कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या दर्शनासाठी सोलापूर स्थानकावरून रवाना झाले.
Mangalwedha
Mangalwedha sakal

मंगळवेढा : आ. समाधान आवताडे यांच्या पुढाकारातून पंढरपूर- मंगळवेढा या मतदारसंघातील 280 कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या दर्शनासाठी सोलापूर स्थानकावरून रवाना झाले.

अयोध्या येथे नुकत्याच झालेल्या राम मंदिराच्या मूर्ती स्थापनेदिवशी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये काही गावात टाळ मृदंगाच्या गजरात गावातून दिंडी काढण्यात आली. संपूर्ण तालुक्यामध्ये वातावरण भक्तीमय झाले होते. परंतु प्रत्यक्ष राम मंदिर पाहण्याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती त्यासाठी संपूर्ण देशभरामधून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अयोध्या दर्शन सुरू आहे.

याचाच एक भाग सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यानाही संधी देण्यात आली.त्यामध्ये अक्कलकोट दक्षिण सोलापूर शहर उत्तर शहर मध्ये मोहोळ पंढरपूर मंगळवेढा अशा सहा विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्ते सोलापूर स्थानकावरून येथून 20 डब्यांच्या विशेष आस्था रेल्वेने मतदारसंघातील 1345 जण आयोध्येसाठी रवाना झाले. जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय अशा घोषणांनी रेल्वे स्टेशन दणाणून गेले होते.

यामध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील 280 कार्यकर्ते दर्शनासाठी आ. समाधान आवताडे यांच्या पुढाकारातून मार्गस्थ झाले. शहरांमधील सांगोला नाका येथून सोमनाथ अवताडे यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करून आयोध्यासाठी रवाना झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, दिगंबर यादव ,नागेश डोंगरे, आदित्य हिंदुस्तानी, दत्तात्रय साबणे,उपस्थित होते.

सोलापूर रेल्वे स्थानकावर आ विजयकुमार देशमुख उद्योजक संजय अवताडे सोलापूर जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण मनीष देशमुख अक्कलकोट येथील युवा नेते मिलन कल्याणशेट्टी तसेच विविध पदाधिकारी कार्यकर्ते रेल्वे विभागीय अधिकारी रेल्वे लोहमार्ग अधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून सहभागी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com