esakal | सोलापूर ग्रामीणमध्ये 281 नवे कोरोनाबाधित रुग्ण 
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर ग्रामीणमध्ये 281 नवे कोरोनाबाधित रुग्ण 

सोलापूर ः सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये आज नव्याने 281 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एक हजार 833 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी एक हजार 552 अहवाल निगेटिव्ह आले तर 281 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज सहा जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. ग्रामीण भागातील बाधितांची संख्या आता आठ हजार 661 एवढी झाली आहे. 

सोलापूर ग्रामीणमध्ये 281 नवे कोरोनाबाधित रुग्ण 

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये आज नव्याने 281 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज एक हजार 833 जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी एक हजार 552 अहवाल निगेटिव्ह आले तर 281 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज सहा जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. ग्रामीण भागातील बाधितांची संख्या आता आठ हजार 661 एवढी झाली आहे. 

आज महूद (ता. सांगोला) येथील 65 वर्षांचे पुरुष, काळा मारुती मंदिराजवळ पंढरपूर येथील 73 वर्षाचे पुरुष, हरिदास गल्ली पंढरपूर येथील 82 वर्षाची महिला, महाळूंग (ता. माळशिरस) येथील 75 वर्षांचे पुरुष, अरण (ता. माढा) येथील 76 वर्षाचे पुरुष तर अकलूज (ता. माळशिरस) येथील 45 वर्षांच्या महिलेचे कोरोनाने आज बळी घेतला आहे. कोरोनाने आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 243 एवढी झाली आहे. अद्यापही दोन हजार 825 जण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय पाच हजार 593 जण कोरोनामुक्त णा मुक्त होऊन घरी परतले आहेत. 

या गावात नवीन रुग्ण आढळले 
अक्कलकोट तालुक्‍यातील बुऱ्हाणपूर, गौडगाव बु. तोळणूर, करमाळा तालुक्‍यातील जेऊर, शिवाजीनगर, माढा तालुक्‍यातील बारलोणी, भोसरे, केवड, कुंभेज, रांजणी, सुर्ली, टेंभूर्णी, मंगळवेढा तालुक्‍यातील आरळी, चांभार गल्ली, लवंगी, लक्ष्मी दहिवडी, मुर्डे गल्ली, नागणे प्लॉट, नागणेवाडी, नाव्ही गल्ली, पंढरपूर रोड, क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, सलगर बुद्रुक, शिक्षक कॉलनी, मोहोळ तालुक्‍यातील गोटेवाडी, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील गुळवंची, कोंडी, सांगोला तालुक्‍यातील घेरडी, बलवडी, खडतरे गल्ली, कोष्टी गल्ली, महूद, मुजावर गल्ली, प्राध्यापक कॉलनी, वाकी शिवणे, दक्षिण सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्प, तांदुळवाडी, विंचूर, बार्शीतील 442 झोपडपट्टी, आगळगाव, अलीपूर रोड, भीम नगर, बुरुड गल्ली, देशमुख प्लॉट, ढेंबरेवाडी, फुले प्लॉट, गाडेगाव रोड, गोंडिल प्लॉट, कापसे बोळ, कसबा पेठ, खांडवी, कोरफळे, लहुजी चौक, लातूर रोड, नागणे प्लॉट, सोजर स्कूल जवळ, मल्लिकार्जुन मंदिराजवळ, पांढरी, पांगरी, श्रीपत पिंपरी, सोलापूर रोड, तुळजापूर रोड, उपळाई रोड, वैराग, पंढरपुरातील आंबेडकर नगर, अनिल नगर, भाई भाई चौक, भंडीशेगाव, बोहाळी, चौफाळा, दाळे गल्ली, देगाव, गादेगाव, गांधी रोड, गोकुळ नगर, गुरसाळे, इसबावी, जैनवाडी, जुनी माळी गल्ली, जुनी पेठ, कडबे गल्ली, कासेगाव, काशीकापडी गल्ली, कौठाळी, लक्ष्मी टाकळी, महावीर नगर, मंगळवेढेकर नगर, मुंडेवाडी, रुक्‍मिणी शाळेजवळ, विवेक वर्धनी हायस्कूलजवळ, रघुकुल सोसायटी, संतपेठ, सिद्धेवाडी, स्टेशन रोड, सुस्ते उमदेगल्ली, उपरी, वाडीकुरोली, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, आनंदनगर, बिजवडी, चाकोरे, माळीनगर, महाळूंग, मांडवे, नातेपुते, सवतगाव, श्रीपूर, वेळापूर, वाफेगाव, यशवंत नगर याठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 
 

loading image
go to top