सोलापूरच्या ग्रामीण भागात आज आढळले 285 नवे कोरोनाबाधित रुग्ण 

सोलापूरच्या ग्रामीण भागात आज आढळले 285 नवे कोरोनाबाधित रुग्ण 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज सरासरी 250-300 च्या दरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहेत. ग्रामीण भागात काही केल्या कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रशासनाला अद्यापही यश आले नाही. आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 285 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे आज सात जणांचा बळी गेला आहे. 

बार्शी तालुक्‍यातील खामगाव येथील 75 वर्षाचे पुरुष, कांदलगाव येथील 80 वर्षाची महिला, नारी येथील 60 वर्षाचे पुरुष, अलीपूर रोड येथील 50 वर्षाची महिला, सांगोला तालुक्‍यातील नाझरे येथील 57 वर्षाचे पुरुष व 70 वर्षाची पुरुष तर कारखाना रोड मित्र नगर मंगळवेढा येथील 60 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात आठ हजार 946 जण बाधित झाले आहेत. मृत्यू झालेल्यांची संख्या 250 एवढी झाली आहे. कोरोनावर अद्यापही दोन हजार 866 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. पाच हजार 830 जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडले आहे. अद्यापही 144 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

या गावात आढळलेले नवे करून अबाधित 
अक्कलकोट तालुक्‍यातील अरळी, गौडगाव, समर्थनगर, वागदरी, बार्शी तालुक्‍यातील आगळगाव, अलीपूर रोड, अशोक नगर, बारंगुळे प्लॉट, बुरुड गल्ली, घोडके प्लॉट, कासारवाडी रोड, कसबा पेठ, काटेगाव, कोरफळे, लोखंड गल्ली, पंकज नगर, फुले प्लॉट, शेंद्री, श्रीपत पिंपरी, सुभाषनगर, ताडसौदणे, उक्कडगाव, उपळाई रोड, वैराग, यशवंनगर, माढा तालुक्‍यातील बावी, भोसरी, चिंचगाव, कुंभेज, कुर्डू, कुर्डूवाडी, रिधोरे, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बागेचीवाडी, बोरगाव, दसूर, फोंडशिरस, खंडाळी, कोंढारपट्टा, कुसमोड, लवंग, महाळूंग, माळीनगर, संग्रामनगर, वडगाव, श्रीपूर, तांदुळवाडी, शिक्षक कॉलनी, वेळापूर, यशवंनगर, मंगळवेढ्यातील चोखामेळा नगर, दामाजी नगर, डिकसळ, हजापूर, जित्ती, लक्ष्मी दहिवडी, नंदूर, मोहोळ तालुक्‍यातील सावळेश्वर, येल्लमवाडी, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील बीबी दारफळ, गुळवंची, पडसाळी, इंडियन ऑइल कंपनी पाकणी, पंढरपुरातील अनिल नगर, भंडीशेगाव, चळे, चंद्रभागा घाट, दाळे गल्ली, एकलासपूर, घोंगडे गल्ली, गोविंदपुरा, इसबावी, कान्हापुरी, खर्डी, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, नवीपेठ, नवीन कराड नाका, अर्बन बॅंकेजवळ, विठ्ठल मंदिराजवळ, परदेशी नगर, संभाजी चौक, सांगोला रोड, संतपेठ, शेळवे, उमदे गल्ली, सांगोला तालुक्‍यातील अनकढाळ, कोष्टी गल्ली, महूद, मांजरी, मेथवडे, सावे, वाकी, दक्षिण सोलापुरातील वळसंग, बोरामणी, मनगोळी, होटगी स्टेशन, करमाळ्यातील भीम नगर, चांगुडे गल्ली, गणेश नगर, जातेगाव, केम, कोळगाव, कृष्णाजी नगर, मंगळवार पेठ, साडे गल्ली, संभाजीनगर, सावडी, सवत गल्ली, सुतार गल्ली, वेताळ पेठ, विद्यानगर याठिकाणी आज नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com