३ मुले आई-वडिलाविना पोरकी! पत्नीच्या चारित्र्यावर संशय; शेवटचे समजावून सांगायला गेला अन्‌ चाकूने भोसकून केला पत्नीचा खून

रिक्षाचालक पतीने चारित्र्याच्या संशयातून चाकूने भोसकून पत्नीचा खून केला. मंगळवारी सकाळी आठ वाजता रमाबाई आंबेडकर नगरात ही घटना घडली. जोडभावी पेठ पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. त्याला उद्या (बुधवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Solapur Crime
Solapur Crimeesakal
Updated on

सोलापूर : रिक्षाचालक पतीने चारित्र्याच्या संशयातून चाकूने भोसकून पत्नीचा खून केला. मंगळवारी सकाळी आठ वाजता रमाबाई आंबेडकर नगरात ही घटना घडली. जोडभावी पेठ पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. त्याला उद्या (बुधवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुहास तुकाराम सिद्धगणेश (वय ४३, रा. तळेहिप्परगा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

सुहास व त्याची पत्नी यशोदा हे न्यु बुधवार पेठेतील रमाबाई आंबेडकर नगरातील पत्र्याच्या शेडमध्ये राहायला होते. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. पण, सततच्या वादामुळे सुहास व यशोदा सहा महिन्यांपासून वेगवेगळे रहात होते. दोन्ही मुले सुहासकडे तर लहान मुलगी पत्नी यशोदासोबत राहायला होती. पत्नीच्या वागण्यामुळे आपले आयुष्य बरबाद झाल्याचा राग सुहासला होता. तिला शेवटचे सांगावे, तिचे वर्तन सुधारेल का पहावे म्हणून सुहास मंगळवारी तिच्या घरी गेला. पत्नीची मावशी अन्नपूर्णा बाळशंकर या कामावर जात होत्या. तेवढ्यात सकाळी आठ वाजताच पत्नी यशोदासोबत बोलायचे म्हणून सुहास घरी आला होता. त्यांचे बोलणे सुरू असतानाच यशोदा जोरात ओरडली.

सुहासने रागाच्या भरात यशोदाच्या गळ्यावर चाकू मारला. त्यानंतर पोटातही चाकू खुपसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यशोदाला तेथेच सोडून सुहास निघून गेला. यशोदाच्या मावशीची आरडाओरड ऐकून त्याठिकाणी जमलेल्यांनी तिला बेशुद्धावस्थेत सिव्हिल हॉस्पिटलला नेले. पण, यशोदाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता. मृताची मावशी अन्नपूर्णा बाळशंकर यांच्या फिर्यादीवरून सुहास सिद्धगणेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

३ मुलांची आई मृत, वडील तुरुंगात

पत्नीच्या चुकीच्या वागण्यामुळे चिडलेल्या यशोदाला शेवटचे सांगायला म्हणून सुहास मंगळवारी (ता. १४) तिच्या घरी गेला होता. पत्नी ऐकून घेत नव्हती, ती सुहाससोबत राहायला नकार देत होती. त्याने तिचा खून केला. आता सुहास तुरुंगात जाईल. त्यामुळे त्यांची तिन्ही मुले आई-वडिलांविनाच राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com