
वैराग : पुणे येथून शेताकडे पाहणी करण्यासाठी जात असताना बार्शी- कुर्डुवाडी रस्त्यावर चारचाकी वाहन दोघांनी दुचाकीवरून येऊन अडवला. छातीला पिस्तूल लावून शिवीगाळ व दमदाटी करीत जिवे ठार मारण्याची धमकी देत रोख सात हजार रुपये, मोबाईल, चारचाकी वाहन असा तीन लाखांचा ऐवज लंपास केला. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.