
पंढरपूर : चळे (ता. पंढरपूर) येथील एका पुरातन व ऐतिहासिक गोलघुमटामध्ये एक शिलालेख सापडला आहे. हा शिलालेख सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचा असून, निजामाच्या काळात बहिर्जी पाटील यांनी हा घुमट बांधल्याचे यातून समोर आले आहे. या शिलालेखाचा पुरातत्त्व विभागाने सखोल अभ्यास करावा, अशी मागणी येथील इतिहासप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.