सोलापुरात उरले 307 रुग्ण ! आज 20 ठिकाणी आढळले 30 पॉझिटिव्ह; आतापर्यंत नऊ हजार 780 रुग्ण बरे झाले

1Corona_93.jpg
1Corona_93.jpg
Updated on

सोलापूर : शहरात आज 567 संशयितांमध्ये 24 पुरुष आणि सहा महिला पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. शहरातील 20 ठिकाणी आज नवे रुग्ण आढळले असून दुसरीकडे शहरातील ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या आता 307 वर आली आहे.

ठळक बाबी...

  • आतापर्यंत शहरातील एक लाख 30 हजार 124 संशयितांची कोरोना टेस्ट
  • शहरात आतापर्यंत आढळले दहा हजार 662 कोरोना पॉझिटिव्ह
  • एकूण रुग्णांपैकी नऊ हजार 780 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  • आज शहरात आढळले 30 नवे रुग्ण; आता शहरात उरले 307 बाधित रुग्ण
  • एकूण रुग्णांमध्ये सहा हजार 324 पुरुष तर चार हजार 338 महिलांचा समावेश

शहरात आज मोहिते नगर (होटगी रोड), मंत्री चंडक पार्क, आदित्य नगर (विजयपूर रोड), स्वामी विवेकांनद नगर, दावत चौक, शिवयोगी नगर (जुळे सोलापूर), सोनामोती अपार्टमेंट (दक्षिण सदर बझार), एसआरपीएफ कॅम्प (सोरेगाव), कमल नगर (हैदराबाद रोड), व्यंकटेश नगर (अक्‍कलकोट नगर), न्यू पाच्छा पेठ (अशोक चौक), प्रभाकर हौसिंग सोसायटी (सम्राट चौक), महालक्ष्मी नगर (शेळगी), मसरे गल्ली, भाग्यश्री पार्क (ओम नम:शिवाय नगर), दोंडे नगर (रामवाडी), श्रीदेवी नगर (आकाशवाणी केंद्राजवळ), अभिषेक नगर (अक्‍कलकोट रोड), बुधवार पेठ आणि रेल्वे स्टेशनजवळ नव्या रुग्णांची भर पडली आहे. रुग्णांच्या संपर्कातील 132 संशयित होम क्‍वारंटाईन असून 16 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 16 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com