
प्रमिला चोरगी
सोलापूर : यात्रेत डौलाने निघणाऱ्या सातही नंदीध्वजांपैकी मानाच्या पहिल्या नंदीध्वजाला भक्तांकडून खोबर अन॒ खारीक हार बांधण्याची परंपरा आहे. कमीतकमी पाच ते अधिकाधिक 21 किलो वजनाचे हार नंदीध्वजाला बांधतात. भक्तगणांकडून नंदीध्वजाला बांधले जाणारे खारीक व खोबरं खरेदी ही गेल्या 35 वर्षांपासून लाड कुटुंबियांकडून केली जाते. भक्तांसाठी लाड कुटुंबियांकडून माफक दरात खारीक व खोबर उपलब्ध करून देण्याची अविरत सेवा आजतागायत केली जाते.