esakal | शहरात दिड हजार टेस्टपैकी 37 व्यक्‍ती पॉझिटिव्ह ! एकाचा झाला मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

5e6f13b6214ed825688f3203 - Copy.jpg

ठळक बाबी... 

  • शहरातील 54 हजार 858 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत सहा हजार 225 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा 
  • एकूण रुग्णांपैकी 396 जणांचा मृत्यू; आज 38 जणांना घरी सोडले 
  • शहरातील चार हजार 660 रुग्णांनी केली कोरोनावर मात 

शहरात दिड हजार टेस्टपैकी 37 व्यक्‍ती पॉझिटिव्ह ! एकाचा झाला मृत्यू 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील एक हजार 566 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये आज 37 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे आज 38 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

न्यू पाच्छा पेठ, जुनी मिल चाळ (मुरारजी पेठ), कोटणीस नगर, माशाळ वस्ती, रेल्वे लाईन, मुरारजी पेठ, रेवणसिध्देश्‍वर नगर, दिपज्योती नगर (होटगी रोड), निलम नगर, जमादार वस्ती, सुनिल नगर, नागनाथ सोसायटी (एमआयडीसी), विजापूर नाका (रिक्षा स्टॉपजवळ), मंगळवार पेठ (बुधले गल्ली), हत्तुरे वस्ती, संतोष नगर, गुरुदत्त नगर, रचना सोसायटी (जुळे सोलापूर), उत्तर कसबा, विडी घरकूल, वसंत विहार (जुना पुना नाका), अभिमानश्री नगर, मनोरमा बॅंकेजवळ (कोटणीस नगर), सुविद्या नगर (आयटीआयसमोर), भगवंती सोसायटी (आयटीआयजवळ), लक्ष्मी-विष्णू हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), मंत्री चंडक (विजयपूर रोड), बालाजी हौसिंग सोसायटी, रविवार पेठ आणि उमा हौसिंग सोसायटी (मुरारजी पेठ) याठिकाणी नव्या रुग्णांची आज भर पडली आहे. रेल्वे लाईन परिसरातील 82 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. 

ठळक बाबी... 

  • शहरातील 54 हजार 858 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत सहा हजार 225 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा 
  • एकूण रुग्णांपैकी 396 जणांचा मृत्यू; आज 38 जणांना घरी सोडले 
  • शहरातील चार हजार 660 रुग्णांनी केली कोरोनावर मात बाईज हॉस्पिटलमध्ये 50 बेडची उपलब्धता 
शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने महापौर श्रीकांचना यन्नम आणि महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी ठोस नियोजन केले आहे. महापालिकेच्या बॉईज हॉस्पिटलमध्ये आता 50 बेड तयार ठेवले जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते श्रीनिवास करली, उपायुक्त अजयसिंह पवार, आरोग्याधिकारी डॉ. शीतल जाधव यांनी या ठिकाणी भेट दिली. 50 बेडची सुविधा ऑक्‍सिजनसह करण्यात येणार आहे. ऑक्‍समीटरही बसविले जाणार आहे. आठ दिवसांत हॉस्पिटल सुरू करण्यात येईल, अशी माहिती आयुक्‍त शिवशंकर यांनी दिली.

loading image
go to top