esakal | प्राध्यापकांची उपासमार ! सात महिन्यांपासून नाही वेतन 
sakal

बोलून बातमी शोधा

Salary.jpg


महाडीबीटीकडून लागतोय विलंब 
2019-20 मध्ये चार लाख 19 हजार 930 विद्यार्थ्यांपैकी एक लाख 49 हजार 606 विद्यार्थ्यांना 36 कोटी 92 लाखांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली आहे. आणखी दोन लाख आठ हजार विद्यार्थ्यांना 464 कोटींची शिष्यवृत्ती वितरित करणे बाकी आहे. मार्चएंडपर्यंत सर्व रक्‍कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन आहे, परंतु केंद्र सरकारच्या महाडीबीटी प्रणालीतून मंजुरीला विलंब लागत आहे. 
- माधव वैद्य, सहसंचालक, शिक्षण, समाजकल्याण, पुणे 

प्राध्यापकांची उपासमार ! सात महिन्यांपासून नाही वेतन 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये, फार्मसी कॉलेजसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांच्या माध्यमातून तीन लाख 83 हजार 822 विद्यार्थ्यांनी समाजकल्याण आयुक्‍तालयाकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले. त्यापोटी महाविद्यालयांना 364 कोटी 13 लाख रुपये मिळणे अपेक्षित आहेत. मात्र, मागील सात महिन्यांत दमडाही मिळाला नसल्याने राज्यातील तब्बल 400 हून अधिक महाविद्यालयांमधील 37 हजार प्राध्यापकांचे वेतन अडकले आहे. 

हेही नक्‍की वाचा : शिष्यवृत्ती मिळेना ! सव्वातीन लाख विद्यार्थ्यांना प्रतीक्षा 


सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज केंद्र सरकारच्या महाडीबीटी आणि पर्सनल फंड मॅनेजमेंट सिस्टिम (पीएफएमएस) च्या माध्यमातून पडताळले जातात. मात्र, महाडीबीटी व पीएफएमएसची क्षमता दररोज 25 ते 30 हजार अर्ज पडताळणीएवढीच असल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला विलंब होत असल्याचा खुलासा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केला होता. प्रत्यक्षात, मात्र समाजकल्याण आयुक्‍तालयाकडून अर्जाची माहितीच महाडीबीटीला वेळेत पोचत नसल्याचे समोर आले आहे. विलंबाने पोचलेल्या अर्जांची पडताळणी वेळेत होत नसल्याने प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

हेही नक्‍की वाचा : एकतर्फी प्रेमात दोघे मरु म्हणाला अन्‌... 


विनाअनुदानित व्यावसायिक महाविद्यालयांची स्थिती 
एकूण 
393 
वेतनाच्या प्रतीक्षेतील प्राध्यापक 
37,000 
वेतन नसलेले शिक्षकेतर कर्मचारी 
18,000 
शिक्षण, परीक्षा शुल्काची प्रलंबित रक्‍कम 
364.13 कोटी 


हेही नक्‍की वाचा : खासदार डॉ. महास्वामींच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी फैसला 


अर्ज पाठविण्यासाठी "टक्‍केवारी'ची मागणी 
अभियांत्रिकी, फार्मसीसह अन्य व्यावसायिक विनाअनुदानित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज जिल्हा स्तरावरील सहायक समाजकल्याण आयुक्‍तांकडे पाठविले जातात. अर्जाची पडताळणी करून ते अर्ज समाजकल्याण आयुक्‍तांकडे पाठविले जातात. मात्र, महाविद्यालयांना मिळणाऱ्या एकूण रकमेतून एक ते पाच टक्‍के कमिशन द्यावे, अशी मागणी सहायक समाजकल्याण आयुक्‍तालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून केली जाते, असा खुलासा सोलापुरातील एका नामवंत महाविद्यालयातील प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला. सोलापूरसह राज्यातील 13 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अद्यापही सहायक आयुक्‍त समाजकल्याण कार्यालयाकडे असल्याचे समोर आले आहे.  

हेही नक्‍की वाचा : 'कोरोना'मुळे शिक्षक संघाचे अधिवेशन रद्द 

loading image