सोलापुरात 381 चाचण्यांमध्ये सापडले 21 नवे कोरोना बाधित 

corona
corona
Updated on

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत बुधवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचण्यांचे 381 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 360 अहवाल निगेटिव्ह आले असून 21 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. सोलापूर महापालिका हद्दीतील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 9 हजार 346 झाले आहे. 

आजच्या अहवालानूसार एकाच दिवशी 26 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आज नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये कुमठे गाव, व्ही. एम. जी. एम. सी. हॉस्टेल, रंगराज नगर, शेळगी येथील रमण शेट्टी नगर, मुरारजी पेठ येथील उमा नगरी, इंदिरानगर, होटगी रोड वरील कस्तुरबा पार्क जवळ, जुळे सोलापुरातील वामन नगर, गंगाधर हौसिंग सोसायटी, दमाणीनगर, मुस्लिम पाच्छा पेठेतील जेलरोड जवळ, बुधवार पेठेतील मिलिंद नगर, विजापूर रोड, मजरेवाडीतील गजानन नगर, गणेश नगर, शेळगीतील धर्मराज नगर, मंगल रेसिडेन्सी, आदर्श नगर मधील विश्राम हाउसिंग सोसायटी, शाहीर वस्ती या भागात नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सोलापूर शहरातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 9 हजार 346 झाली असून आतापर्यंत 8 हजार 236 जण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनामुळे 522 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून रुग्णालयात सध्या 588 जणांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com