Solapur News : साडेचार लाख क्विंटल कांद्याची आवक; बाजार समितीतील सहा दिवसातील स्थिती, सरासरी भाव चौदाशे रुपयांवर

कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसेंदिवस कांद्याची आवक वाढू लागली आहे.
4 lakh quintal onion arrive at solapur agri market average price of rs 1400
4 lakh quintal onion arrive at solapur agri market average price of rs 1400esakal

Solapur News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसेंदिवस कांद्याची आवक वाढू लागली आहे. सोमवारी (ता. ८) बाजार समितीत ९६६ गाड्या (९६ हजार ६७३ क्विंटल) कांदा आला होता.

आवक वाढल्याने कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी भाव चौदाशे रुपयांपर्यंतच मिळाला. दरम्यान, मागील सहा दिवसांत सोलापूर बाजार समितीत तब्बल चार लाख ६० हजार क्विंटल कांदा आला, पण शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळालाच नाही.

यंदा देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशा प्रमाणात कांदा उपलब्ध राहणार नाही आणि त्यामुळे कांद्याचे दर वाढतील म्हणून केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला.

मात्र, बाजार समित्यांमधील वस्तुस्थिती खूपच वेगळी असून दररोज लाखो क्विंटल कांद्याची आवक होत आहे. सोलापूर बाजार समितीत ३० डिसेंबरपासून तब्बल चार हजार ५९३ गाड्या (नऊ लाख १९ हजार ८१९ पिशव्या) कांद्याची आवक झाली आहे.

त्यातून ६९ कोटींची उलाढाल झाली, पण शेतकऱ्यांच्या पदरात निम्मीदेखील रक्कम पडलेली नाही. गाडी भाडे, पिशव्यांचा खर्च, काढणी, चिरून भरणीवर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. निर्यातबंदीपूर्वी प्रतिक्विंटल सरासरी भाव तीन हजारांवर होता आणि सर्वाधिक दर साडेचार हजारांहून अधिक होता. पण, निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर निम्म्याने कमी झाले असून त्यात अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही.

बारदाना अन्‌ भाड्यावर पावणेसहा कोटींचा खर्च

कांद्याच्या एका पिशवीला (बारदाना) शेतकऱ्यांना ३३ ते ३६ रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे कांदा भरलेल्या एका पिशवीला २० ते २८ रुपयांपर्यंत गाडी भाडे द्यावे लागत आहे. मागील सहा दिवसांत सोलापूर बाजार समितीत कांदा आणलेल्या शेतकऱ्यांना बारदान्यासाठी सव्वातीन कोटी रुपये मोजावे लागले आहेत.

दुसरीकडे तो कांदा बाजार समितीत विक्रीसाठी आणायला अडीच कोटींचे गाडी भाडे द्यावे लागले आहे. कांदा काढणी व चिरून भरणी यासाठी प्रतिदिवस एका व्यक्तीला ३०० ते ३५० रुपयांची मजुरी देखील द्यावी लागत आहे. सध्या खर्चाच्या तुलनेत बळिराजाच्या पदरात काहीच फायदा पडत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

सोलापूर बाजार समितीतील सहा दिवसांतील स्थिती

  • एकूण कांदा आवक - ४,५९,९१० क्विंटल

  • एकूण कांदा पिशव्या - ९,१९,८१९

  • सहा दिवसांतील गाड्या - ४,५९३

  • एकूण उलाढाल - ६९.०२ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com