Ganja Seized
sakal
मोहोळ - अंकोली, ता. मोहोळ येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्या शेजारील पत्र्याच्या खोलीत 20 लाख 19 हजार रुपयाचा 40 किलो गांजा सापडला असल्याची घटना तारीख 16 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी भैरवनाथ नरहरी भोसले (वय-51) रा. अंकोली असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याला अटक करून मोहोळ येथील न्यायालया समोर उभे केले असता त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.