

प्रभूलिंग वारशेट्टी
सोलापूर : गेल्या काही वर्षांपासून सोलापुरात युवतींना लाठी-काठी दांडपट्टा, तलवार, ढाल, रायफल शूटिंग आदी शस्त्रांसह मर्दानी खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना स्वसंरक्षण करता यावे यासाठी हे प्रशिक्षण दरवर्षी देण्यात येते. आतापर्यंत ४०० वीर युवती तयार करण्यात हिंदुराष्ट्र सेना व रूद्रशक्ती गुरूकुलने यश प्राप्त केले आहे.