झेडपी आरोग्य विभागातील 7 तर 'सिव्हिल'मधील डॉक्टरांसह 46 कर्मचारी कोरानाबाधित | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Civil Hospital
झेडपी आरोग्य विभागातील 7 तर 'सिव्हिल'मधील डॉक्टरांसह 46 कर्मचारी कोरानाबाधित

ZP आरोग्य विभागातील 7 तर 'सिव्हिल'मधील 46 कर्मचारी कोरानाबाधित

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांना जीवनदान देणारी यंत्रणा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (Chhatrapati Shivaji Maharaj Sarvopchar Rugnalaya) व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने (Solapur Zilla Parishad's Health Department) प्रभावी काम केले. ओमिक्रॉन (Omicron) / तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीलाच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव (Dr. Shitalkumar Jadhav) यांच्यासह सर्वोपचार रुग्णालयात 41 डॉक्‍टर (Doctor) कोरोना बाधित झाले आहेत. या सर्वांची प्रकृती ठीक असून काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही जणांना होम आयसोलेशनमध्ये (Home Isolation) ठेवण्यात आले आहे. (41 doctors at the Civil Hospital, including the DHO, were Corona affected)

हेही वाचा: दिड्डम्‌... दिड्डम्‌... सत्यम्‌... सत्यम्‌..! अक्षता सोहळा संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील 41 डॉक्‍टर आणि 5 नर्स (Nurses) असे एकूण 46 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात काम करणारे सात जण कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील प्रशासकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, दोन कनिष्ठ सहाय्यक कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात माध्यमिक शिक्षण, आरोग्य विभाग व प्राथमिक शिक्षण विभाग एकाच इमारतीत आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील तीन कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. निर्बंध लावल्यानंतरही जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासह या सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची नेहमीप्रमाणेच वर्दळ दिसत आहे.

हेही वाचा: आधार क्रमांकाद्वारे कोणी तुमच्या बॅंक बॅलन्सवर डल्ला मारू शकेल?

सोलापूर महापालिका हद्दीत गुरुवारी (ता. 13) नव्या 217 कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये 139 पुरुष तर 78 महिलांचा समावेश आहे. दाराशा नागरी आरोग्य केंद्र परिसरात सर्वाधिक 40, रामवाडी नागरी आरोग्य केंद्र परिसरात 37, देगाव आरोग्य केंद्र परिसरात 21 तर जिजामाता व साबळे आरोग्य केंद्र परिसरात प्रत्येकी 19 रुग्णांची भर पडली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top