
सोलापूर : माणसं उच्चशिक्षित झाली परंतु सुशिक्षित झाली नाहीत. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. स्वच्छता ईश्वरचेच दुसरे नाव आहे.. सांगत होते दुचाकीवरून २९ जिल्ह्यांतून ३४५० किलोमीटर प्रवास करून सोलापुरात दाखल झालेले ६९ वर्षीय स्वच्छतादूत यशवंत कन्हेरे. स्वच्छ भारत आणि हरित भारत हे ब्रीद घेऊन प्रबोधन करत ते फिरत आहेत. मंगळवारी त्यांनी दैनिक सकाळ कार्यालयास भेट दिली. संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शिवानंद चौगुले उपस्थित होते.