सोलापूर : देशात वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) मंजूर झाल्याने साखर पेठेतील वक्फ बाधित ८० कुटुंबांच्या मनात न्याय मिळण्याची आशा जागली आहे. महापालिका हद्दीतील साखर पेठेतील सर्व्हे क्र. ९९८० येथे गेल्या चार पिढ्यांपासून अनेक हिंदू कुटुंब (Hindu Family) राहतात.