Solapur: ८० वर्षाची आई आजारी आहे, डीजे वाजवणाऱ्या मंडळाला केली विनंती पण...; पोलिसांकडून गुन्हा दाखल
सोलापुरातील देगाव रस्त्यावरील कोयनानगर येथे दोन दिवसांपूर्वी डीजेच्या कर्कश आवाजामुळे ८० वर्षांची आईला कायमचा आला बहिरेपणा याप्रकरणी सलगर वस्ती पोलिस ठाण्यात मंडळाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला
Solapur: घरात ८० वर्षांची आजारी आई झोपली आहे. डीजेच्या कर्कश आवाजाचा तिला त्रास होतो आहे. आवाज थोडे कमी करा, अशी विनंती करणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तीस मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तिथेच बसवून ठेवले. कर्कश आवाज थांबलाच नाही.