नाशिकच्या कंपनीकडून सोलापुरातील ९३ जणांची ९४ लाखांची फसवणूक! फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा; एक संशयित अटकेत

२५ हजारांच्या पटीत पैसे गुंतवल्यावर ४५ दिवसांनी दरमहा १५ टक्के रक्कम परत मिळेल. एक वर्षानंतर गुंतवलेली संपूर्ण रक्कम आणि मोठा परतावा दिला जाईल, असे आमिष दाखवून सोलापुरातील ९३ जणांना नाशिक येथील मनी सिर्केट मल्टिट्रेड प्रा.लि. कंपनीच्या तिघांनी ९३,९४,४०० रुपयास फसविल आहे.
assembly elections in gujarat election commission says record cash liquor and freebies seized
assembly elections in gujarat election commission says record cash liquor and freebies seized sakal
Updated on

सोलापूर : २५ हजारांच्या पटीत पैसे गुंतवल्यावर ४५ दिवसांनी दरमहा १५ टक्के रक्कम परत मिळेल. एक वर्षानंतर गुंतवलेली संपूर्ण रक्कम आणि मोठा परतावा दिला जाईल, असे आमिष दाखवून सोलापुरातील तब्बल ९३ जणांना नाशिक येथील मनी सिर्केट मल्टिट्रेड प्रा.लि. कंपनीच्या तिघांनी ९३ लाख ९४ हजार ४०० रुपयास फसविल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अरविंद मेहता या संशयिताला अटक केली असून न्यायालयाने त्याला २३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

निलम नगरातील स्वाती लालूप्रसाद मुत्याल या गेंट्याल चौकातील वरदायिनी हॉस्पिटल येथे नोकरीला आहेत. त्यांचे पती मुंबईतील कंपनीत नोकरीला आहेत. त्यांच्या ओळखीच्या पुष्पा विभूते यांच्या घरी कामानिमित्त गेल्यावर तेथे गणेश चौंखडे व गणेश भोसले या दोघांशी ओळख झाली. चौंखडे व भोसले हे दोघे त्या कंपनीचे एजंट होते.

त्यावेळी त्यांच्याकडून फिर्यादी स्वाती मुत्याल यांना नाशिकच्या मनी सिर्केट मल्टिट्रेड कंपनीबद्दल माहिती मिळाली. त्या एजंटांनी कंपनीची स्कीम फिर्यादी व त्यांच्या पतीला समजावून सांगितली. त्यानंतर १ फेब्रुवारी ते २९ ऑगस्ट २०१९ या सात महिन्यात फिर्यादी स्वाती मुत्याल यांच्यासह इतर ९२ जणांनी या कंपनीत ९४ लाखांहून अधिक रक्कम गुंतवली. सुरवातीला काही मोबदला दिला गेला, पण शेवटी कंपनीने ९३ लाख ९४ हजार ४०० रुपये परत दिलेच नाही.

शेवटी स्वाती मुत्याल यांनी फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले आणि सचिन सुधाकर वरखडे (रा. ओम नगर, जेलरोड, नाशिक), अमोल नरेंद्र खोंड व अरविंद मेहता (दोघेही रा. नाशिक) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून त्यातील मेहताला जेरबंद केले आहे.

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

गुंतवलेल्या रकमेला ४५ दिवस पूर्ण झाल्यानंतर दरमहा १५ टक्के परतावा मिळेल. १२ महिन्यानंतर गुंतवलेली रक्कम परत मिळेल, असे आमिष दाखवून नाशिक येथील दाते नगरातील दिव्यांजली अपार्टमेंटमधील मनी सिर्केट मल्टिट्रेड या कंपनीने सोलापुरातील ९३ जणांना गंडा घातला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मोहन पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com