
मायलेकीच्या खुनाने हादरला करमाळा तालुका! संशयित आरोपी पती फरार
करमाळा (सोलापूर) : भिलारवाडी (ता. करमाळा) (Karmala) येथे एका घरात सोमवारी (ता. 8) पहाटे सकाळी मायलेकीचा खून (Crime) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा खून नवऱ्याने केल्याचा संशय आहे. घरात रक्ताच्या थारोळ्यात मायलेकीचा मृतदेह दिसून आल्यानंतर ही घटना उघडकीस झाली. लक्ष्मी अण्णा माने (वय 35) व मुलगी श्रुती वय (13) असे खून झालेल्या मायलेकीची नावे आहेत तर अण्णा भास्कर माने (वय 40) असे खून केलेल्या संशयित आरोपी पतीचे नाव आहे.
हेही वाचा: राज्यातील एसटी जागेवरच थांबली! 24 जिल्ह्यांतील बससेवा बंद
याचा तपास करण्यासाठी करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सोमवारी (ता. 8) ही घटना समोर आली असून खून झालेल्या महिलेचा पती फरार झाला आहे. सकाळी वडिलांच्या गाडीचा आवाज आल्याने मुलगा रोहित हा जागा झाला. रोहित जागा झाल्यानंतर त्याने आपल्या वडिलांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग पाहिले. त्यानंतर तो मोठ्याने आरडाओरडा करू लागला. तेवढ्यात वडील अण्णा माने हा सुसाट गाडीवर निघून गेला. त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले व खोलीत जाऊन पाहिले तर मायलेकी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यामुळे पती खून करून फरार झाला असल्याची चर्चा आहे.
सोमवारी सकाळी एकाने करमाळा पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. लक्ष्मी अण्णासाहेब माने व त्यांची 14 वर्षाची मुलगी या दोघींचाही मृतदेह भिलारवाडी येथील त्यांच्या राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात दिसला आहे. संशयित आरोपी पतीने त्यांना रात्रीच मारून जखमी करून खून केला आहे. दोघीही पहाटेपर्यंत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. यावेळी त्या ठिकाणी नातेवाइकांनी पाहिल्यानंतर दोघीही मृत झाल्याचे दिसून आले. परिसरात लक्ष्मीचा पती अण्णा हा मिळून न आल्याने दोघींचा खून करून तो फरार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा: 'ST'कडे 40 हजार अतिरिक्त कर्मचारी! तीन पर्यायांतून निघणार मार्ग
आजीजवळ झोपल्याने वाचला मुलगा; अन्यथा...
रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याच्या वेळी अण्णा माने याने आपली पत्नी, मुलगी व मुलगा यांना खोलीत झोपण्यासाठी बोलावले. पत्नी व मुलगी हे झोपण्यासाठी खोलीत आले; मात्र मुलगा रोहित माने (वय 15) हा आपल्या आजीजवळ झोपला. रोहित हा इयत्ता नववीत शिकत आहे. रोहित हा आजीजवळ झोपल्यामुळे त्याचा जीव वाचला; अन्यथा रोहितला देखील जिवे मारण्याचा अण्णा माने याचा डाव असल्याचे बोलले जात आहे.
Web Title: A Big Crime Has Taken Place At Bhilarwadi In Karmala Taluka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..