50 हजार रुपयांत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची विक्री ! बार्शीत चार जणांवर गुन्हा दाखल

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची 50 हजार रुपयांस विक्री केल्याने बार्शीत चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे
रेमडेसिव्हिर
रेमडेसिव्हिरईसकाळ

बार्शी (सोलापूर) : शहरात विनापरवाना, विना बिलाने, डॉक्‍टरच्या परवानगीशिवाय दोन रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची (Eemdesivir injection) विक्री 50 हजार रुपयांना झाली असून, बनावट इंजेक्‍शनचा संशय आल्याने इंजेक्‍शन परत घ्या, पैसे परत द्या, असे बोलूनही पैसे मिळाले नाहीत. निर्धारित दरापेक्षा जास्त दराने, गैरमार्गाने इंजेक्‍शनची विक्री केल्याप्रकरणी चार जणांविरोधात बार्शी शहर पोलिस (Barshi Police Station) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (A case has been registered against four persons in Barshi for selling remdesivir injection for Rs fifty thousand)

अमित सुभाष वायचळ (रा. जावळी प्लॉट), निखिल राजकुमार सगरे (रा. बळेवाडी, ता. बार्शी), विकास काशीनाथ जाधवर (रा. जावळी प्लॉट, बार्शी), भैय्या इंगळे (रा. येडशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नामदेव भालेराव (औषध निरीक्षक, अन्न प्रशासन विभाग, सोलापूर) यांनी बुधवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे.

रेमडेसिव्हिर
माजी मंत्री सावंतांचा सरकारला घरचा आहेर ! म्हणाले, कोरोना कामात शासन-प्रशासनाचा सावळा गोंधळ

रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णाला रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची गरज भासल्याने संशयित आरोपींशी संपर्क साधला व 50 हजार रुपये फोन पे अकाउंटवर देण्यात आले. पण इंजेक्‍शनवरील टोल फ्री नंबरवर फोन केला असता तो नंबर अवैध असल्याचे सांगण्यात आले. संशय आल्याने इंजेक्‍शन परत घ्या, पैसे परत करा, असे म्हणताच एकमेकांवर ढकलाढकली सुरू झाली. माझे नाव सांगू नको, असे बोलून पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. ही घटना 7 मे रोजी सायंकाळी साडेआठ वाजता घडली. 8 मे रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान चर्चा होऊनही काही निष्पन्न झाले नाही.

इंजेक्‍शन ज्या व्यक्तीकडून आणले आहेत तो परत घेत नाही, यातून वाद निर्माण झाला. अखेर पोलिस ठाण्यात तक्रार देताच गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com