दुधाच्या कॅनमधून दारु वाहतूक करणारा गवळी कामती पोलिसांच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुधाच्या कॅनमधून दारु वाहतूक करणारा गवळी कामती पोलिसांच्या जाळ्यात

कामती पोलिसांनी त्या दूधवाल्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

दुधाच्या कॅनमधून दारु वाहतूक करणारा गवळी कामती पोलिसांच्या जाळ्यात

कोरवली (सोलापूर): दारुची तस्करी करणाऱ्यांकडून वेगवेळ्या क्‍लुप्त्या वापरल्या जातात. दुधाच्या कॅन देशी विदेशीची दारु वाहतूक करण्याची घटना कामती पोलिसांनी उघडकीस आणली आहे. सोलापूर- मंगळवेढा महामार्गावर वाघोली (ता. मोहोळ) येथील दुग्ध व्यवसायिकास दुधाच्या कॅनमधून देशी-विदेशी दारूची तस्करी करताना रंगेहाथ पकडले.

हेही वाचा: कोरवली ग्रामपंचायत बिनविरोधचा बार फुसका ! पॅनेलप्रमुखांची जोरदार मोर्चेबांधणी 

कामती पोलिसांनी त्या दूधवाल्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. दत्तात्रय विश्वनाथ पाटील (वय 36 ) रा. वाघोली (ता. मोहोळ) असे त्या संशयिताचे नाव आहे. तो वाघोली येथील शेतकऱ्याकडून दूध घेऊन दररोज सोलापूरला जाऊन दूध विक्रीचा व्यवसाय करीत होता. पोलिस सूत्रांनुसार दत्तात्रय पाटील हा (एम. एच.13 डि.के 2199) या मोटार सायकलला दुधाचे कॅन अडकवून देशी व विदेशी दारू बेकायदेशीररित्या आणि विनापरवाना विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती हवलदार जीवराज कासवीद यांना मिळाली.

हेही वाचा: आतापासूनच सुरू झाल्या कोरवली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधच्या हालचाली !

त्यानुसार त्यांनी महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना ती संशयित गाडी थांबवून चौकशी केली. दुधाचे कॅन उघडून पाहिले असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या देशी व विदेशी दारूच्या एकूण 55 बाटल्या आढळून आल्या. याबाबत पोलीस श्रीकांत देवकते यांनी फिर्याद दाखल केली आहे. दारू, कॅन, मोटरसायकल असा एकूण चोवीस हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली जीवराज कासवीद अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A Man Has Been Caught Smuggling Domestic And Foreign Liquor From A Milk Can In Wagholi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimewagholi
go to top