शहर-जिल्ह्यात 1625 नवे कोरोना बाधित ! 44 जणांचा मृत्यू

शहर-जिल्ह्यात गुरुवारी 1625 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 44 जणांचा मृत्यू झाला
corona
coronaMedia Gallery

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात आज (गुरुवारी) 1 हजार 625 नव्या कोरोनाबाधित (Covid-19) रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात 1 हजार 539 तर महापालिका हद्दीत 86 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आज एकाच दिवशी 1 हजार 548 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये 1 हजार 429 जण हे ग्रामीण भागातील तर 119 जण हे महापालिका हद्दीतील आहेत. (A total of 1625 new corona-infected patients were found in the city-district on Thursday)

कोरोनामुळे 44 जणांचा मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यातील 35 जण हे ग्रामीण भागातील तर नऊ जण हे महापालिका हद्दीतील आहेत. रुग्णालयात सध्या 16 हजार 893 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 15 हजार 618 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 1 हजार 275 रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे.

बार्शी तालुक्‍यातील नऊ जणांचा मृत्यू

कोरोनामुळे आज ग्रामीण भागात 35 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक नऊ मृत्यू बार्शी तालुक्‍यातील आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातील चार, माळशिरस तालुक्‍यातील पाच, मंगळवेढा व मोहोळ तालुक्‍यातील प्रत्येकी दोन, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील चार, पंढरपूर तालुक्‍यातील पाच व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील पाच जणांचा यामध्ये समावेश आहे.

पंढरपूरमध्ये 296 नवीन बाधित

ग्रामीण भागात आज 1 हजार 539 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 296 रुग्ण पंढरपूर तालुक्‍यातील आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातील 42, बार्शी तालुक्‍यातील 193, करमाळा तालुक्‍यातील 116, माढा तालुक्‍यातील 178, माळशिरस तालुक्‍यातील 258, मंगळवेढा तालुक्‍यातील 157, मोहोळ तालुक्‍यातील 140, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 30, सांगोला तालुक्‍यातील 96 आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 33 नव्या कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com