जिल्ह्यात शुक्रवारी 2155 नवे कोरोनाबाधित ! एकाच दिवशी 1724 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात शुक्रवारी 2155 नवे कोरोना पॉझिटिव्ही रुग्ण आढळून आले आहेत
Corona
CoronaMedia Gallery
Updated on

सोलापूर : शहर व जिल्ह्यात शुक्रवारी 2 हजार 155 नव्या कोरोना (Covid-19) बाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये 2 हजार 36 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 119 रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत. आज एकाच दिवशी 1 हजार 724 जण कोरोनामुक्त (Coronafree) झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यातील 1 हजार 568 रुग्ण हे ग्रामीण भागातील तर 156 रुण हे महापालिका हद्दीतील आहेत. (A total of 2155 new corona positive patients were detected in the district on Friday)

Corona
"लहान मुलांमध्ये कोरोना गंभीरतेचे प्रमाण अत्यल्प ! कोरोनामुक्त मुलांना मात्र "पीआयएमएस'चा धोका'

कोरोनामुळे 39 जणांचा मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यातील 36 जण ग्रामीण भागातील तर तीन जण महापालिका हद्दीतील आहेत. रुग्णालयात सध्या 17 हजार 285 ऍक्‍टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 16 हजार 50 जण ग्रामीण भागातील तर 1 हजार 235 जण हे महापालिका हद्दीतील आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नव्या रुग्णांची संख्या घटू लागली आहे.

Corona
ऑन ड्यूटी शिक्षकांवर कोरोनाचा घाव ! शहरात 29 शिक्षक कोरोनाबाधित; तिघांचा मृत्यू

तीन तालुक्‍यांत प्रत्येकी सहा मृत्यू

ग्रामीण भागात शुक्रवारी कोरोनामुळे 36 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये बार्शी, माढा व पंढरपूर या तीन तालुक्‍यांत प्रत्येकी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील प्रत्येकी 4, माळशिरस व मोहोळ तालुक्‍यातील प्रत्येकी 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

माळशिरसमध्ये 403 नवे बाधित

ग्रामीण भागात आज 2 हजार 36 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये माळशिरस तालुक्‍यात सर्वाधिक 403 नवीन रुग्ण आढळले आहेत. अक्कलकोट तालुक्‍यात 65, बार्शी तालुक्‍यात 272, करमाळा तालुक्‍यात 165, माढा तालुक्‍यात 199, मंगळवेढा तालुक्‍यात 293, मोहोळ तालुक्‍यात 158, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 31, पंढरपूर तालुक्‍यात 269, सांगोला तालुक्‍यात 144, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 37 नवीन रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur city police
solapur
Suryan Mukne from Pandharpur selected as Sub-Lieutenant in Indian Navy
34th Water Struggle Council in Mangalwedha demands completion of irrigation projects
Marathi News Esakal
www.esakal.com