वाटेतच मुलीला लागली तहान, पाणी घेऊन आल्यावर 'ते' पाहून बापाला बसला धक्‍का | Solapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाटेत मुलीला लागली तहान, पाणी घेऊन आल्यावर 'ते' पाहून बसला धक्‍का
वाटेतच मुलीला लागली तहान, पाणी घेऊन आल्यावर 'ते' पाहून बापाला बसला धक्‍का!

वाटेत मुलीला लागली तहान, पाणी घेऊन आल्यावर 'ते' पाहून बसला धक्‍का

सोलापूर : मागील काही दिवसांपासून मुली बेपत्ता (Missing) होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. भवानी पेठेतून 24 वर्षीय एक महिला व तरुणी 17 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली आहे. तर सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur-Pune National Haghway) एका हॉटेलमध्ये दुचाकीवरून जेवायला जाताना मुलीला तहान लागली म्हणून बाळेजवळ थांबून पती पाणी आणायला गेल्यानंतर पत्नी व तीन वर्षांची चिमुकली गायब झाली आहे. काही वेळात दोघीही गायब झाल्याने त्यांना धक्‍काच बसला. तसेच जुना तुळजापूर नाका येथील महाविद्यालयात क्‍लाससाठी म्हणून आलेली 21 वर्षीय तरुणीही पसार झाली आहे.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार! विलिनीकरणाला 'हा' अडथळा

कोरोनाच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद असून अजूनही पूर्ण क्षमतेने सर्वकाही सुरू झालेले नाही. शाळकरी मुली, तरुणी घरीच बसून आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे प्रत्येकाकडे आता मोबाईल आला आहे. दरम्यान, पालक कामानिमित्त घराबाहेर जात असल्याने त्यांच्यातील संवाद हरवला आहे. अशा परिस्थितीत तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. 17 नोव्हेंबर रोजी भवानी पेठ परिसरातून एक महिला व तरुणी घरात कोणालाही न सांगता निघून गेल्या आहेत. नातेवाइकांकडे शोध घेतला, परतु त्यांचा तपास लागला नाही. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांत नातेवाइकांनी तक्रार दिली आहे. दुसरीकडे, महाविद्यालयात क्‍लास व प्रॅक्‍टिकल आहे म्हणून घरातून बाहेर पडलेली 21 वर्षीय तरुणी तरुणासोबत पसार झाल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली आहे. ही घटना 18 नोव्हेंबर रोजी घडली आहे. पोलिस आता त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा: माळीनगरमध्ये अनर्थ टळला, ऊस वाहतुकीचा ट्रेलर पोलिस चौकीत घुसला!

महिलेसह चिमुकली दहा मिनिटात गायब

विजयपूर रोडवरील पती-पत्नी व त्यांची तीन वर्षाची चिमुकली असे तिघेजण दुचाकीवरून सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवायला जात होते. दुपारी एकच्या सुमारास मुलीला तहान लागली म्हणून ते बाळेजवळ थांबले. दुचाकी रस्त्यालगत लावून पती पाण्याची बाटली आणायला गेले. दहा मिनिटात पाण्याची बाटली घेऊन आल्यानंतर पत्नी व चिमुकली त्या ठिकाणी दिसलीच नाही. त्यानंतर नातेवाइकांकडे चौकशी करूनही त्यांचा शोध न लागल्याने त्या महिलेच्या पतीने फौजदार चावडी पोलिसांत धाव घेतली. आता पुढील तपास पोलिस करत आहेत.

loading image
go to top