आयटीच्या तरुणाचे मार्केटिंग! पपईतून नऊ तर केळीतून आठ लाखांचे उत्पन्न

"आयटी'च्या तरुणाचे मार्केटिंग! पपईतून नऊ तर केळीतून आठ लाखांचे उत्पन्न
"आयटी'च्या तरुणाचे मार्केटिंग! पपईतून नऊ तर केळीतून आठ लाखांचे उत्पन्न
"आयटी'च्या तरुणाचे मार्केटिंग! पपईतून नऊ तर केळीतून आठ लाखांचे उत्पन्नCanva
Summary

लॉकडाउनच्या काळात गावाकडे आल्यानंतर वर्क फ्रॉम होम करत महेशने घरच्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली.

चिखलठाण (सोलापूर) : शेतात पिकविलेले सोन्यासारखे पीक (Crop) मातीमोल भावाने व्यापारी घेत असल्याचे पाहून शेतकऱ्याचा आयटी (IT Industry) क्षेत्रामध्ये काम करणारा मुलगा आला धावून. स्वतःची नोकरी सांभाळत शेतमालाचे पुण्यात (Pune) केले मार्केटिंग (Marketing) व दोन एकर पपईपासून नऊ लाख तर दोन एकर केळीचे घेतले आठ लाख रुपये. शेटफळ (ता. करमाळा) येथील महेश किसन नाईकनवरे असे या तरुणाचे नाव असून तो पुण्यात एका नामांकित अमेरिकन स्वॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला आहे. (A young man working in an IT company is marketing his agricultural products-ssd73)

"आयटी'च्या तरुणाचे मार्केटिंग! पपईतून नऊ तर केळीतून आठ लाखांचे उत्पन्न
आबासाहेबांच्या प्रकृतीतील सुधारणा हा एक दैवी चमत्कार !

लॉकडाउनच्या (Lockdown) काळात गावाकडे आल्यानंतर वर्क फ्रॉम होम करत महेशने घरच्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. घरच्या दोन एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड करून भरघोस उत्पादन घेण्यात तो यशस्वी झाला; परंतु लॉकडाउनमुळे चांगला दर मिळत नाही, त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळू शकत नाही, हे लक्षात येताच पुण्यात रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून स्वतः कलिंगड विकले. कलिंगडानंतर या शेतात पपईचे पीक घेतले. त्याच वेळी दुसऱ्या दोन एकर क्षेत्रावर केळी पिकाच्या बाबतीत दराची अशीच अवस्था होती. व्यापारी निर्यातक्षम (Export Quality) केळीची खरेदी तीन रुपये किलो करत होते. हे पाहून महेशने आपल्या शेतातील पिकांचे मार्केटिंग करण्याचे ठरवले.

"आयटी'च्या तरुणाचे मार्केटिंग! पपईतून नऊ तर केळीतून आठ लाखांचे उत्पन्न
सीईटी रजिस्ट्रेशन ! सर्व्हर डाउनबाबत भाजपचा आंदोलनाचा इशारा

आपण आपल्या शेतातील माल शहरात विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांपर्यंत थेट पोचवला तर काय होईल, याचा सर्व्हे महेशने केला. यानंतर त्याच्या लक्षात आले, की आणखी तीस ते चाळीस टक्के उत्पन्न जादा मिळू शकते. पपई थेट देणे शक्‍य होते; परंतु केळी पिकवण्याची अडचण होती. तेव्हा त्याने आपण पुणे येथे राहात असलेल्या ठिकाणी जागा भाड्याने घेऊन केळी पिकवण्यासाठी चेंबर तयार केले. यानंतर एका मजुराच्या मदतीने पुण्यातील काही सोसायट्यांच्या आवारात भरत असलेल्या शेतकरी बाजारामध्ये या मालाची विक्री केली. सध्या हडपसर, मांजरी परिसरातील चाळीस ते पन्नास किरकोळ विक्रेत्यांना तो आपल्या शेतातील केळी व पपई विकतो. आपल्या शेतात तयार झालेल्या मालाची मूल्य साखळी तयार करण्यात तो यशस्वी झाला असून, दोन एकर केळीपासून आजपर्यंत आठ लाख तर पपईचे नऊ लाख रुपये उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. एका नामवंत आयटी कंपनीत काम करणाऱ्या या शेतकरीपुत्राने आपल्या वडील व भावाने आपल्या शेतात पिकवत असलेल्या शेतमालाचे मार्केटिंग करण्यात व चांगले उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. त्याचा हा प्रयोग परिसरातील सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे.

शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकविलेल्या कोणत्याच मालाला अपेक्षित दर मिळत नाही. मध्यस्थ व्यापाऱ्यांकडूनही अनेकवेळा शेतकऱ्यांची लूट होते. अशावेळी शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या मालाचे मार्केटिंग स्वत:च करायला हवे. शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना प्रत्यक्षात आली तरच शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू शकतात.

- महेश नाईकनवरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com