पवनचक्कीचा गट्टू अंगावर पडल्याने चेंगरून तरुणाचा जागीच मृत्यू!

पवनचक्कीचा गट्टू अंगावर पडल्याने चेंगरून तरुणाचा जागीच मृत्यू! सांगोला तालुक्‍यातील घटना
पवनचक्कीचा गट्टू अंगावर पडल्याने चेंगरून तरुणाचा जागीच मृत्यू!
पवनचक्कीचा गट्टू अंगावर पडल्याने चेंगरून तरुणाचा जागीच मृत्यू!Sakal
Updated on: 
Summary

भरधाव दोन कंटेनरने एकमेकांना कट मारल्याने कंटेनरवरील पवनचक्कीचा अवजड गट्टू अंगावर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

सांगोला (सोलापूर) : भरधाव दोन कंटेनरने एकमेकांना कट मारल्याने कंटेनरवरील पवनचक्कीचा अवजड गट्टू रोडच्या शेजारून शतपावली करून घराकडे परतणाऱ्या तरुणाच्या अंगावर पडला. या अवजड गट्टूखाली चेंगरल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. (Accident) हा अपघात बुधवारी (ता. 20) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सांगोला (Sangola) - पंढरपूर (Pandharpur) रोडवरील साई गणेश मंगल कार्यालयाजवळ घडला.

या दुर्घटनेत सुशांत वसंतराव खंडागळे (41, रा. संगेवाडी, ता. सांगोला) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुशांत खंडागळे हे सांगोला शेतकरी सूत गिरणीत सुरक्षा अधिकारी म्हणून नोकरीस होते. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. "सकाळ'चे सांगोला तालुका बातमीदार दत्तात्रय खंडागळे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

पवनचक्कीचा गट्टू अंगावर पडल्याने चेंगरून तरुणाचा जागीच मृत्यू!
भंडीशेगाव येथे बिबट्यासदृश प्राण्याची दहशत! जर्सी गाईचा पाडला फडशा

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संगेवाडी येथील सुशांत वसंतराव खंडागळे हे बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घरातून सांगोला रोडने शतपावली करत मेथवडे फाट्यापर्यंत चालत गेले होते. दरम्यान सांगोल्याकडून भरधाव वेगाने आरजे -01 जीई- 5431 हा कंटनेर पवनचक्कीचा अवजड गट्टू घेऊन पंढरपूरकडे निघाला होता. तर पंढरपूरकडून भरधाव वेगाने एनएल 01- एबी 1611 हा कंटेनर लोखंडी साहित्य घेऊन सांगोल्याकडे येत होता. दोन्ही कंटेनेर चालकांनी साई गणेश मंगल कार्यालयाजवळ एकमेकांना कट मारल्याने हिसका बसून कंटेनरवरील पवनचक्कीचा अवजड गट्टू शतपावली करून घराकडे परतणाऱ्या सुशांत खंडागळे यांच्या अंगावर पडला. या गट्टूखाली चेंगरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला.

या अपघाताची माहिती मिळताच फौजदार लिंबाजी पवार, पोलिस नाईक गणेश मेटकरी, होमगार्ड गणेश झाडबुके यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. याबाबत संतोष विठ्ठल खंडागळे (रा. संगेवाडी) यांनी पोलिसात खबर दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shardiya Navratri Begins in Maharashtra with Ghatasthapana at Tuljapur Mahur Kolhapur and Saptashrungi Temple
Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Marathi News Esakal
www.esakal.com