Aadhaar carde
Aadhaar cardesakal

Aadhaar Server Jam: आधार-पॅन लिंकेज मुदतीत अशक्य; दुरुस्तीची शेकडो प्रकरणे सर्वरवर प्रलंबीत

मागील दोन महिन्यापासून आधार-पॅन लिंकेजसाठी नागरिकांकडून धावपळ सुरु आहे.
Published on

सोलापूर : आधार- पॅन लिंकेजसाठी हजारो लोकांनी आधार अपडेट प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर आधार सर्वरकडून मागील पंधरवडाभरापासून अपडेटचे काम होत नसल्याने अडचण झाली आहे. या प्रकारामुळे पॅन कार्ड दुरुस्ती व आधार-पॅन लिंकेजची कामे देखील अडकल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मागील दोन महिन्यापासून आधार-पॅन लिंकेजसाठी नागरिकांकडून धावपळ सुरु आहे. अनेकांना आधी आधार दुरुस्ती करून नंतर त्यावर आधारित पॅन कार्ड दुरुस्ती करणे आवश्यक झाले होते. त्यासाठी सुरवातीला आधार अपडेट प्रक्रियेची शेकडो प्रकरणे आधार सर्वरवर पाठवली गेली. पण अपडेटची प्रक्रिया अचानक संथ झाली.

एक महिन्यापूर्वी ज्यांनी आधार अपडेट केले होते. त्यांना अद्याप त्यांचे आधार अपडेट झाल्याचे मेसेजेस येत नसल्याचे आढळले. हे नागरिक आधार केंद्रावर जाऊन त्यांचे अपडेटचे फॉर्म दाखविल्यानंतर त्यांना वरुनच अपडेट मेसेज येत नाहीत असे सांगितले जात नाही. मेसेज आल्याशिवाय आधार दुरुस्तीची प्रिंट काढता येत नाही.

Aadhaar carde
Solapur : ‘चिमणी’ शांत; आता पुढे काय? सोलापूरकर, शेतकरी अन्‌ सभासदांच्या मनात प्रश्‍नच प्रश्‍न

आधार दुरुस्ती झाल्यानंतर पॅनकार्ड दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने आधार दुरुस्तीसाठी हजारो नागरिक खोळंबले आहेत. या प्रकारामुळे पॅनकार्ड दुरुस्तीची कामे देखील अडकली आहे. अनेक नागरिकांना पॅनकार्ड दुरुस्तीनंतर आधार-पॅन लिंकेज करावयाचे असल्याने ही सर्व कामे लांबली आहेत.

केंद्र शासनाने आधार-पॅन लिंकेजची मुदत ३० जून दिली आहे. पण प्रत्यक्षात केंद्राच्या आधार यंत्रणेचे अपडेट होत नसल्याने ही मुदत वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. आधार सर्वरमधील अपडेशनचा वेग वाढवण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही. यासाठी आता आधार-पॅन लिकेंजची मुदत वाढवण्याची मागणी केली जात आहे. किंवा आधार अपडेट फॉर्मवरच लिंकेज प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा करून द्यावी असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

Aadhaar carde
Crime news : ' घराभोवती नेहमी चकरा मारायचा अन्..' तरूणाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नेमके काय घडले?

  • - आधार कार्ड दुरुस्तीची शेकडो प्रकरणे सर्वरवर प्रलंबीत.

  • - आधार दुरुस्ती नसल्याने पॅन कार्ड दुरुस्ती होईना.

  • - पॅन कार्ड दुरुस्तीअभावी लिंकेजेसची कामे खोळंबली.

  • - आधार-पॅन कार्ड लिंकेजची मुदत वाढवण्याची गरज.

  • - आधार दुरुस्ती फॉर्मवर पॅन दुरुस्ती व लिंकेजची सुविधा द्या.

  • - महिनाभरापासून आधार अपडेट मेसेजची अर्जदारांना प्रतीक्षा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com