कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक! जाणून घ्या मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक! जाणून घ्या मुदत
कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक! जाणून घ्या मुदत

कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक! जाणून घ्या मुदत

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : दोन लाखांच्या कर्जमाफीतील (Debt forgiveness) पात्र शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी (Bank) सरकारला पाठविली. त्यातील ज्यांना लाभ मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांना आधार कार्ड (Aadhar Card) प्रमाणीकरण (Authentication) करण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र, कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही 924 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेच नाही. आधार प्रमाणीकरणासाठी विशिष्ट मुदत नाही, परंतु लवकरात लवकर ते करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी (District Deputy Registrar) केले आहे.

हेही वाचा: 2 ते 17 वर्षांच्या मुलांना COVAXIN चा डोस! जानेवारीपासून लसीकरण

सोलापूर जिल्ह्यातील 80 हजार 36 शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी सरकारला सादर केली. दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदारांचाच त्यात समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 72 हजार 877 शेतकऱ्यांना कर्जमाफीतून 648 कोटी 98 लाख रुपये मिळाले. अजून सात हजार 159 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अपेक्षित असून त्यातील काही शेतकरी अपात्र ठरले आहेत. शासकीय नोकदार, इन्कम टॅक्‍स भरणाऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. दरम्यान, कर्जाची रक्‍कम, आधार क्रमांक चुकीचा असल्याबद्दल एक हजार 646 शेतकऱ्यांनी तालुका व जिल्हास्तरीय समितीकडे तक्रारी नोंदविल्या. त्यातील सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून सध्या जिल्हा उपनिबंधकांकडे 13 तर तहसीलदार पातळीवर 26 तक्रारी प्रलंबित आहेत.

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदारांच्या कर्जमाफीचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. तत्पूर्वी, कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. तरीही, जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने त्यांना आता शेवटची संधी देण्यात आली आहे. आगामी काही दिवसांत त्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्यास कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार नाही, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दोन लाखांपर्यंतचे जे थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत, त्यांनी लवकरात लवकर संबंधित बॅंकेच्या शाखेतून अथवा आपले सरकार सेवा केंद्रातून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. जिल्ह्यातील 924 शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या पात्र यादीत आहेत, तरीही त्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही.

- कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर

दोन लाखांच्या कर्जमाफीची स्थिती...

  • बॅंकांकडून अपलोड खातेदार : 80,036

  • आधार प्रमाणीकरण खाती : 73,746

  • कर्जमाफी मिळालेले खातेदार : 72,877

  • कर्जमाफी मिळालेली रक्‍कम : 648.98 कोटी

  • प्रोत्साहन अनुदान अन्‌ दोन लाखांवरील कर्जमाफी नाहीच

हेही वाचा: विधान परिषदेच्या निकालाकडे सोलापूर कॉंग्रेसचे लक्ष!

बॅंकांकडून घेतलेल्या शेती कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदानातून प्रत्येकी 50 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर दोन लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत (ओटीएस) दोन लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. तत्पूर्वी, त्यांना दोन लाखांवरील थकबाकी भरावी लागणार आहे. परंतु, कोरोनामुळे तिजोरीत पैसा नसल्याने त्यासंबंधीचा निर्णय अजूनपर्यंत घेतलेला नाही.

loading image
go to top