
सोलापूर : आण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनातून उदयाला आलेल्या व दिल्ली, गोवा या राज्यात हातपाय पसरलेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नवख्या आम आदमीने तीनशे जागा लढवून 145 जागी यश मिळविले असून चार ग्रामपंचायतीत पूर्ण बहुमत मिळाले असल्याचे ट्विट राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या व प्रवक्त्या प्रिती मेनेन यांनी केले आहे.
ग्रामीण राजकारणाची नाडी ना भाजप व कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षांनाही अद्याप ओळखता आली नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेने या पक्षांचाच अद्याप बोलबाला आहे. शहरी भागातील पक्षांना ग्रामीण राजकरणात जम बसविणे कठीण जाते. मात्र, नुकत्याच उदयाला आलेल्या व सातत्या सर्वसमान्य माणसांचे प्रश्न हताळणाऱ्या आम आदमी पार्टीने ग्रामीण राजकरणात दमदार एंन्ट्री केली आहे. पहिल्याच वर्षी राज्यात 300 जागा लढवत 145 ग्रामपंचायात सद्स्य विजयी झाले आहेत. चार ग्रामपंचायतीत पूर्ण बहुमत मिळवले आहे.
या ठिकाणी जिंकले आपचे उमेदवार
आपने लातूर, नागपूर, सोलापूर, नाशिक, गोंदिया, चंद्रपूर, पालघर, हिंगोली, अहमदनगर, जालना, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील जागा जिंकल्या असून आता किती ग्रामपंचायतीवर आपचे उमेदवार सरंपचपदी निवडून जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथील नऊ उमेदवार विजयी झाले असून हत्तूर ग्रामपंचायतीत 2 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. आरक्षणामुळे आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना सरपंचपदाचीही संधी अनेक ग्रामपंचायतीत आहे. गोवा राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीत बाणवली येथे एक सदस्य विजयी झाला आहे.
ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांनी साम, दाम, दंड अशी सर्व हत्यारे वापरली जातात. सर्वसामान्य उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणूक लढविणे कठीण असते. मात्र, आपच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या वीज, आरोग्य सुविधा, पाणी, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण अश्या मूलभूत समस्या सोडवत केलेल्या कामामुळे शहरांबरोबर तसेच ग्रामीण जनतेनेही पक्षावर विश्वास दाखवला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या विकासनीतीचा विजय आहे.
-अस्लम शेख,
शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी, सोलापूर.
संपादन : अरविंद मोटे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.