esakal | "आप" लढवणार महापालिका निवडणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Solapur

"आप" लढवणार महापालिका निवडणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आम आदमी पार्टी दिल्लीनंतर (Delhi) राज्यभरात हातपाय पसरत असून सोलापूर (solapur) महापालिकेच्या आगमी निवडणुकीत (Election) सर्वच्या सर्व जागा लढवण्याची घोषणा प्रदेश संयोजक रंगा राचुरे (Ranga Rachure) यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर मंध्यान, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, प्रदेश संघटक विजय कुंभार आदी नेते महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी सोलापूरमधील पक्षच्या संघटनेच्या शक्तीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.

आम आदमी पार्टी ही सामजिक कार्यात अग्रेसर असून राज्यभरातील जनता "आप' कडे आशावादी दृष्टीने पाहत आहे. दिलेला शब्द पाळणारा व शब्दाला जागणारा पक्ष म्हणून "आप'ची ओळख आहे. असे त्यांनी सांगितले. यावेळी संहसंयोजक किशोर मांद्यन यांनी सांगितले की, सोलापूर शहरातील विकास विमानतळावाचून आडलेला आहे. शहरात सर्व समस्या सोडवण्यासाठी "आप' बांधील राहिल. सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न घेऊन आजपर्यंत पक्ष लढत आहे. प्रदेश सचिव धनजंय शिंदे यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन संघटना बांधली जात आहे. कोरोना काळात प्रत्यक्ष जनसमान्यांच्या मदतील आपचे कार्यकर्ते धावत होते. स्वतंत्र हेल्पलाईनसह रिक्षारुग्णवाहिका या सारखे उपक्रम आपने राबविले.

हेही वाचा: कोरोना काळात "मुंबईत" मलेरियाच्या चाचण्या घटल्या

प्रदेश संयोजक रंगा राचुरे यांनी सांगितले की, पाणी, शिक्षण व आरोग्य हे विषय केंद्रस्थानी ठेवून दिल्ली मॉडेल राबविले जाईल. स्वत:च्या हक्काचे धरण असतानाही सोलापूर शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा का होतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नव्याने नेतृत्व करू इच्छिनाऱ्यांना संधी देत पक्ष बांधणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, पश्‍चिम महाराष्ट्र संघटक सागर पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष एम. पाटील, कार्याध्यक्ष खतीब वकील, उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, जिल्हा उपाध्यक्ष अतिश गायकवाड, शहराध्यक्ष मो.अस्लम शेख, उपाध्यक्ष हेमंत जाधव, युवाध्यक्ष निहाल किरनळ्ळी, नासिर मंगलगिरी, अरविंद कुलकर्णी, रहीम शेख, आनंद जाधव, मंजूर खानापुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image
go to top