Smart Solapur : आयटी पार्कमुळे स्थलांतर थांबण्याची आशा! स्मार्ट सोलापूरच्या विकासाच्या कक्षा आणखी रुंदावण्याची गरज

सोलापूरने पहिल्या यादीत देशात नववा व राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. तेव्हा सोलापूरकरांना झालेला मनस्वी आनंद अवर्णनीयच होता. राज्यात एकेकाळी अगदी वरच्या क्रमांकावर असलेले सोलापूर विकासात मागे पडले होते, आता ते नव्याने झेप घेऊन पुन्हा एका उंचीवर जाईल,
Solapur
Solapursakal

स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाल्यानंतर सोलापूरकरांच्या आनंदाला अक्षरशः भरते आले होते. परंतु, नंतर काही काळ विसरच झाला. आता मात्र पुन्हा नव्याने सोलापूरची झेप विकासाच्या दिशेने सुरु असल्याचे सकारात्मक चित्र तयार होत असल्याचे पाहून समाधान वाटू लागले. गेल्या कित्येक वर्षांपासून स्मार्ट सोलापुरात आयटी पार्क सुरु होण्याची इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

सोलापूरचा विकास व्हावा, ‘मायग्रेट' झालेल्या तरुणाईला परतण्याची (रिव्हर्स मायग्रेशन) संधी मिळावी, पर्यटन, रोजगार निर्मितीतून सोलापूरचा नावलौकीक व्हावा, येथील अर्थकारण बदलून सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी ‘सकाळ’मधून वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

सोलापूरने पहिल्या यादीत देशात नववा व राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. तेव्हा सोलापूरकरांना झालेला मनस्वी आनंद अवर्णनीयच होता. राज्यात एकेकाळी अगदी वरच्या क्रमांकावर असलेले सोलापूर विकासात मागे पडले होते, आता ते नव्याने झेप घेऊन पुन्हा एका उंचीवर जाईल, असा विश्‍वास वाटतो.

अगदी याच काळात दळणवळणाबाबत सोलापूरने वेगळे वळण घेत उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण केली. पंढरपूर तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास झाला. सोलापूरला जोडणारे पुणे-मुंबई, हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर, बंगळूर अशा रस्त्यांचे उत्तम जाळे विणले गेले. रेल्वेने भारतभर कोठेही प्रवास करण्याची सुविधा तर आधीच आहे, त्यात विद्युतीकरण व दुहेरीकरणाची भर पडल्याने विकासाचा वेग वाढला.

आता केवळ विमानसेवेची प्रतीक्षा आहे. आगामी काळात तीही दूर होण्याची आशा आहे. हा प्रश्‍न लवकर सुटल्यास पायाभूत सुविधांमध्ये (बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर) माहिती व तंत्रज्ञानाच्या (आयटी) महामार्गातील वाटचाल आणखी सुखद होईल.

सोलापुरात केवळ पायाभूत सुविधांअभावी येथील उच्चशिक्षित तरुणाई रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, नोईडा अशा भारतातील बड्या शहरांबरोबरच अगदी परदेशातही स्थिरावली आहे. स्मार्ट सिटी झाल्यानंतर सोलापूरचे वेगळेपण राहणार, त्यातच पुणे, मुंबई, नाशिक अशा शहरातील जागेबरोबरच अन्य सुविधांचा प्रश्‍न निर्माण झाल्यानंतर आपोआपच सोलापूरकडे आयटी कंपन्यांचे पाय वळणार, अशी अपेक्षा होती. आता त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे.

सोलापूरचा लुक' बदलणार

सलगरवस्ती भागातील ६५ एकर परिसरावर तब्बल ८०० कोटींची गुंतवणूक करून पहिल्या टप्प्यात दहा कंपन्यांसाठी पायाभरणी झाली आहे. मार्च २०२४ पर्यंत या कंपन्या सुरु होणार आहेत. भविष्यात आयटी सलग्नित विविध कंपन्यांत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येते. याबरोबरच स्टार्टअपचे जाळेही वाढण्याच्या आशा आहेत.

येथील आयटी पार्कच्या इमारती सिंगापूरच्या धर्तीवर उभारण्यात येणार असल्याने सोलापूरचा लुक'ही बदलेल. भारतीय बनावटीचे रोबोट निर्मिती, सर्च इंजिन, रॉकेट संशोधन अशाप्रकारच्या एआय आधारित कंपन्यांचे जाळे सोलापुरात सुरु होण्याच्या आशा यामुळे पल्लवित झाल्या आहेत. तब्बल दहा हजार तरुणांना रोजगाराच्या संधी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मेडीकल हब अशी ओळख असलेल्या सोलापुरात रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करण्याची योजना आहे. यातून कमी खर्चाच्या मेडीकल हबच्या प्रक्रियेत म्हणजे नवनव्या संशोधनांबरोबरच शस्त्रक्रिया आणि उपचारात नवे उच्चांक प्रस्थापित होतील.

सोलार एनर्जीचा फायदा

उष्णता म्हणजे कडक ऊन ही सोलापूरची मोठी जमेची बाजू आहे, त्यामुळे येथे सोलारवर आधारित उद्योगांचेही प्रमाण वाढण्यास संधी आहे. तसेच येथील कंपन्यांत सोलारच्या वापरामुळे पर्यावरणपूरक वातावरण राहील. प्रत्यक्षात आयटी कंपन्यांची उभारणी होऊन अर्थकारण बदलल्यास सोलापूरचा चेहरामोहरा बदलेल, यात शंका नाही.

एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या सोलापुरात कापड उद्योगाचा मोठा बोलबाला होता. कापड गिरण्या बंद पडल्याने सोलापूरची मोठी पीछेहाट झाल्याचा इतिहास आहे. हा इतिहास तर बदलता येणार नाही. परंतु या नव्या प्रकल्पांमुळे अर्थकारण तरी बदलण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com