
सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागते. त्यामुळे जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो, मात्र वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ‘महावितरण’ने अभय योजनेतून दिली आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक ग्राहकांना या संधीचा लाभ घेण्यासाठी मार्चअखेर मुदत आहे.