भालकेंच्या चुकीमुळेच आवताडेंचा विजय! अभिजित पाटलांचा आरोप

भालकेंच्या चुकीमुळेच आवताडेंचा विजय! अभिजित पाटलांचा परिचारकांवरही निशाणा
भालकेंच्या चुकीमुळेच आवताडेंचा विजय! अभिजित पाटलांचा परिचारकांवरही आरोप
भालकेंच्या चुकीमुळेच आवताडेंचा विजय! अभिजित पाटलांचा परिचारकांवरही आरोपesakal
Summary

अभिजित पाटील यांनी पंढरपूर तालुक्‍यातील राजकारण आणि सहकारी संस्थांविषयी आपली रोखठोक भूमिका मांडली.

पंढरपूर (सोलापूर) : आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असलेला पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये (Vitthal Sugar Factory) गेल्या 18 वर्षांमध्ये चुकीच्या पद्धतीने कारभार केला गेला. त्यातूनच कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. कर्जातून कारखाना बाहेर पडेल की नाही याविषयी आता साशंकता आहे. याला सर्वस्वी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष आमदार भारत भालके (Bharat Bhalke) व त्यांचे पुत्र संचालक भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हे कारणीभूत आहेत, असा गंभीर आरोप करत, भगीरथ भालकेंच्या चुकीमुळे विधानसभा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे (Samadhan Awtade) यांचा विजय झाल्याचा गौप्यस्फोट धाराशिव साखर कारखान्याचे (Dharashiv Sugar Factory) अध्यक्ष व पंढरपूरचे उद्योगपती अभिजित पाटील (Abhijit Patil) यांनी केला आहे. त्यांच्या या थेट आरोपामुळे विठ्ठल परिवारात मोठी खळबळ उडाली आहे. (Abhijit Patil has leveled allegations against Bhalke and Paricharak)

भालकेंच्या चुकीमुळेच आवताडेंचा विजय! अभिजित पाटलांचा परिचारकांवरही आरोप
सिद्धेश्‍वर कारखाना बंद करा! महापालिका आयुक्तांनी बजावली नोटीस

दोन दिवसांपूर्वी अभिजित पाटील यांनी बोलताना पंढरपूर तालुक्‍यातील राजकारण आणि सहकारी संस्थांविषयी आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि जिल्हा दूध संघाचा आवर्जून उल्लेख करत, भगीरथ भालके व आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर निशाणा साधला. श्री. पाटील म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक (कै.) औदुंबर पाटील यांनी मोठ्या कष्टाने उभारलेला कारखाना त्यांच्या पश्‍चात त्यांचे शिष्य असलेले (कै.) आमदार भारत भालके यांच्या काळात आर्थिक डबघाईला आला. 40 कोटींच्या ठेवी शिल्लक असलेल्या या कारखान्यावर आजमितीस सुमारे 600 ते 650 कोटींचे कर्ज आहे. कर्जामुळे कारखाना बंद पडला आहे. कारखाना बंद असल्यामुळे तालुक्‍यातील 30 हजार ऊस उत्पादक सभासद आणि दीड हजार कामगारांचे हाल सुरू आहेत. या परिस्थितीला केवळ भालके कुटुंबीय जबाबदार आहे.

भालकेंच्या चुकीमुळेच आवताडेंचा विजय! अभिजित पाटलांचा परिचारकांवरही आरोप
साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी! 110 लाख टन उत्पादन

भगीरथ भालकेंवर टीका करताना त्यांनी आमदार प्रशांत परिचारकांनाही लक्ष्य केले आहे. चुलते (कै.) सुधाकर परिचारक यांनी पांडुरंग कारखान्याची उभारणी केली. त्यावर आमदार परिचारक हे राजकारण करत आहेत. केवळ एक साखर कारखाना चालवला म्हणजे विकास केला, असा त्याचा अर्थ होत नाही. जिल्हा दूध संघाची आजची परिस्थिती कोणामुळे झाली, असा सवालही अभिजित पाटील यांनी उपस्थित केला. आमदार समाधान आवताडे हे परिचारकांचे बाहुले बनले आहेत. त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही. परिचारकांच्या राजकारणामध्ये (Political) आमदार आवताडे झाकोळून गेले आहेत. केवळ भगीरथ भालकेंच्या चुकीमुळे भाजपचे समाधान आवताडे हे आमदार झाले आहेत, असेही अभिजित पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या या टोलेबाजीमुळे पंढरपूर तालुक्‍यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यावर आमदार परिचारक, आमदार आवताडे आणि भालके काय उत्तर देतात, हे पाहावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com