सोलापुरातील गैरहजर डॅाक्टर, कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई

सोलापुरातील गैरहजर डॅाक्टर, कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई
Updated on

सोलापूर : जागतिक महामारी म्हणून घोषित झालेल्या कोरोनाला प्रतिकार करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. अशा स्थितीत खासगी रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका किंवा कर्मचारी विनाकारण गैरहजर राहत असतील तर त्यांच्यावर महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा मेंटनन्स- मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तशी नोंद खासगी रुग्णालय चालकांनी घ्यावी, असा आदेश महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी आज काढला. 

खासगी रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रजेवर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकरणी काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. डाॅक्टरांसह परिचारिका आणि आवश्यक कार्यालयीन कर्मचारीही रजेवर किंवा अज्ञातस्थळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा सर्वांची नोंद मेस्माअंतर्गत कारवाईसाठी प्रस्तावित करण्यात येतील, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. 

आयुक्तांनी आज काढलेल्या आदेशातील तरतुदी
- महापालिका हद्दीतील सर्व रुग्णालयांनी आपली सेवा शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावी.
- रुग्णालयात असलेल्या एकूण खाटांची संख्या व भरलेल्या व रिकाम्या खाटांची संंख्या रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावावी.
-सर्व रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपचार घेण्यास अनुज्ञेय असलेल्या सर्व रुग्णांना सेवा उपलब्ध करून द्यावी.
- सर्व जनरल प्रॅक्टिश्नरनी साखील नऊ ते दुपारी एक आपले दवाखाने सुरु ठेवणे बंधनकारक आहे.
- कंटेंनमेंट झोनमधील दवाखान्यांनी सकाळी नऊ ते दुपारी एक फिवर ओपीडी सुरु ठेवणे बंधनकारक आहे.
- दवाखान्याचे वेळापत्रक दर्शनी भागावर लावावे व त्यावर संपर्कासाठी दूरध्वनीचा क्रमांक द्यावा.
- सर्व रुग्णालयांनी त्यांच्या भागातील सर्व रुग्णांना सेवा देणे बंधनकारक राहील.
- राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार 80-20 प्रमाणे खाटांची व रुग्णांची संख्या फलकावर दर्शविणे आवश्यक राहील. त्यामध्ये आयसीयू बेड, अॅाक्सिजन, व्हेंटिलेटर इत्यादीचा समावेस असावा.
- रिकाम्या व भरलेल्या खाटांची संख्या फलकावर दर्शविणे आवश्यक आहे.
- हॅास्पिटलमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची उपस्थिती व अनुपस्थितीची यादी दैनंदिन प्रसिद्ध करणे आवश्यक राहील. कारणाशिवाय गैरहजर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र जीवनावश्यक सेवा देखभाल कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.
- कोणीही रुग्ण उपचारासाठी आला असता त्याला परस्पर अन्य दवाखान्याकडे पाठवू नये. अशा रुग्णांची विचारणा करून आवश्यक ती वैद्यकीय सेवा द्यावी.
- ओपीडी, पेशंटची संख्या नोटीस बोर्डावर दाखविणे आवश्यक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com