Accident News : दोन कार च्या अपघातात दोघांचा मृत्यू; चार जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News  Two killed in car accident Four people injured solapur

Accident News : दोन कार च्या अपघातात दोघांचा मृत्यू; चार जण जखमी

मोहोळ : पुण्याहून सोलापूरकडे निघालेल्या कार चा अचानक पुढचा टायर फुटून ती रस्ता दुभाजकाला धडकून दुसऱ्या कार वर आदळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले. हा अपघात सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील वडवळ शिवारात शनिवार ता १० डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता झाला. शशिकांत सदाशिव आधटराव वय ४२ रा माकणी ता लोहारा, निखिल शशिकांत बिराजदार वय ४० रा अक्कलकोट, अशी मयतांची नावे आहेत. तर ओवी निखिल बिराजदार वय ८ रा अक्कलकोट, अनुराधा रविकांत बिराजदार वय ३८ रा उस्मानाबाद, सुनीता शशिकांत अधटराव वय ४० रा माकणी, बालाजी काशिनाथ साठे, वय ५२ रा माकणी ता लोहारा. अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, कार क्रमांक एम एच १२ एस क्यु ८६७ ही पुण्याहून सोलापूर कडे येत होती ती वडवळ शिवारात येतात सदर गाडीचा पुढचा टायर फुटला.टायर फुटल्याने चालकाचा कार वरील ताबा सुटला. सदर ची कार रस्ता दुभाजक ओलांडून पलीकडच्या बाजूस जाऊन सोलापूर ते टेंभुर्णी जाणाऱ्या कार क्र एम एच २५ आर ८६५ हीस धडकली. दोन्ही कार मधील मिळून वरील जखमी व मयत झाले आहेत. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करीत आहेत.