मेटकरवाडी येथील पोलिस पाटील सुनील शिंदे यांचे अपघाती निधन 

Sunil Shinde
Sunil Shinde
Updated on

पाठकळ (सोलापूर) : शहराजवळ असलेल्या खोमनाळ नाक्‍यानजीक मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये (पाठकळ) मेटकरवाडी येथील पोलिस पाटील सुनील दत्तात्रय शिंदे (वय 29) यांचा मृत्यू झाला. 

हा अपघात पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज असून, पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. पोलिस तपासानंतर हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण स्पष्ट होणार आहे. 

सुनील शिंदे हे मेकॅनिकल विभागामध्ये अभियंता असून, त्यांनी पुणे येथे काही दिवस नोकरी केली होती. शहरातील राहणीमान, वाढता खर्च व ग्रामीण भागाची ओढ लागल्यामुळे शहरामध्ये न थांबता ते गावी आले. उच्चशिक्षित असतानाही नोकरीची संधी ग्रामीण भागात नसल्यामुळे बसून काय करायचे, हा प्रश्न त्यांना सतावत असताना, महसूल खात्याकडून पोलिस पाटील पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ती जाहिरात पाहून त्यांनी मेटकरवाडी या गावासाठी असलेल्या रिक्त पदावर भरतीसाठी अर्ज भरला व लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पुणे येथील नोकरीला न जाता त्यांनी पोलिस पाटलाचे कामकाज सुरू केले. 

ते अविवाहित असून त्यांच्या मागे आई, वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. पोलिस पाटील सुनील शिंदे यांच्या अकस्मात अपघाती मृत्यूमुळे मेटकरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Mohol Taluka Appoints Administrators For 73 Gram Panchayats As Eight Officers Shoulder Charge Of Multiple Villages
Amol Shinde Comments On Deshmukh Camp And BJP Rivals As Chandrakant Patil Says Der Hai Andher Nahi
Pandharpur Crime 55 Year Old Woman Held for Allegedly Killing 70 Year Old Lover DNA Report Reveals Victim Identity
Marathi News Esakal
www.esakal.com