
राहुरी : वांबोरी येथील योग प्रशिक्षक अचला जितेंद्र झंवर यांना आयुष योगाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी (ता. २२) यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, एजीएमए व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल आयुष विभागातर्फे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.