
लाच प्रकरणाने शासकीय कार्यालयाची प्रतिमेला धक्का
मंगळवेढा - रेशनच्या मालाचे चलन काढण्यासाठी बाराशे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली. एकूणच या प्रकरणावरून शासकीय कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार वाढ होऊन देखील सर्वसामान्य नागरिकांना कर्मचारी वेठीस धरत असल्याचे या निमित्ताने समोर आले.
शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचा शासकीय कामासाठी तहसीलदार, कृषी, पंचायत समिती, महावितरण, प्रांत कार्यालय आणि भूमिअभिलेख या शासकीय कार्यालयाशी संबंध येतो. कार्यालयात ग्रामीण भागातील नागरिकांची सातत्याने वर्दळ असते परंतु या शासकीय कार्यालयात जनतेच्या सेवेसाठी असलेले कर्मचारी मात्र शासनाची पगार घेऊन शासनाच्या योजनांची अंमलबजावणी किंवा शासनाचे कामकाज करताना सातत्याने आर्थिक मोबदल्याची अपेक्षा करतात ही गोष्ट गांभीर्याने घेण्यासारखी कामासाठी अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कार्यालय प्रमुखाचे नियंत्रण नाही की कर्मचाऱ्याच्या कृत्याला मूक सहमंती असल्याचे आता बोलले जाऊ लागले वडर गल्ली येथील तक्रारदाराने रेशनचे चलन काढण्यासाठी 1200 रू दरमहा घेत असल्याबाबत तक्रार केली.
वास्तविक पाहता तालुक्यातील 105 दुकाने आहेत त्यामुळे दरमहा किती रक्कम गोळा होते आणि होणाय्रा रकमेत आणखी कोण भागीदार आहेत का ? याची चौकशी लाचलुचपत विभाग करणार की या दोघालाच बळी बणवणार हे चौकशी अंती समजणार असले तहसील कार्यालयात नवीन शिधापत्रिका काढणे,ऑफलाइन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक हेलपाट्याने बेजार होते. याशिवाय शेतकरी सन्मान योजनेची नवीन नोंदणी, न्यायप्रविष्ट पटण्यासाठी आवश्यक असलेल्या रेकॉर्ड विभागातील जुने उतारे इतर कामासाठी देखील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे,सेतू व महा ई सेवा केंद्रातून ही लूट होत आहे मात्र याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवून ग्रामीण भागातील कर्मचारी नागरिकांना त्रास न होईल अशा पद्धतीची वागणूक देणे अपेक्षित होते. या प्रकाराकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत खात्याचा पर्याय निवडला याशिवाय कृषी कार्यालय, पंचायत समिती, महावितरण,प्रांत ऑफिस,भुमी अभिलेख या ठिकाणी शासकीय कामासाठी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्याकडून कामासाठी वारंवार हेलपाटे लावली जातात.प्रांत कार्यालयात महामार्ग भूसंपादन मोबादल्यासाठी दिलेला त्रासाने बाधीत शेतकरी वैतागले.
मनरेगामध्ये हजेरी पत्रक काढण्यापासून ते हजेरी पत्रक खतवणे पर्यंत नवीन शेतकरी होरपळून जात आहे परंतु ही ग्रामीण भागातील ही कामे मात्र सहजासहजी मार्गी लावली जात नाहीत त्यासाठी आर्थिक मोबदल्याची अपेक्षा केली जाते राज्यामध्ये संत नगरी म्हणून नावलौकिक असलेल्या मंगळवेढा नगरीत आतापर्यंत अनेक शासकीय कर्मचारी या लाच प्रकरणात बळी पडले. निदान आता तरी त्यांनी त्यांच्या कामाची पद्धत बदलावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी महसूल प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी नवनवे उपक्रम राबविले मात्र त्याच्या विभागाचे कर्मचारी पैशासाठी वेठीस धरत असल्याचे दिसून आले.
Web Title: Action Taken Against Two For Taking Bribe Ration Goods
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..