बेशिस्त वाहनचालकांसाठी नवे दंड! 3 जानेवारीनंतर जागेवरच कारवाई

नववर्षात बेशिस्त वाहनचालकांसाठी नवे दंड! 3 जानेवारीनंतर जागेवरच कारवाई
वाहतूक दंड
वाहतूक दंडsakal
Summary

बेशिस्त वाहनचालकांवर आता नव्या दंडासह नववर्षात (3 जानेवारीनंतर) कारवाई केली जाणार आहे.

सोलापूर : परिवहन आयुक्‍तालयाच्या (Transport Commissionerate) नव्या आदेशानुसार बेशिस्त वाहनचालकांवर आता नव्या दंडासह नववर्षात (3 जानेवारीनंतर) कारवाई केली जाणार आहे. तत्पूर्वी, 'नो चालान ड्राईव्ह'च्या (No Challan Drive) माध्यमातून 2 जानेवारीपर्यंत बेशिस्त वाहनचालकांचे समुपदेशन केले जाणार आहे. त्यानंतर मात्र ऑनलाइन अथवा रोख स्वरूपात जागेवरच दंड भरावा लागणार आहे, अन्यथा संबंधित वाहन जप्त केले जाणार आहे. दंड भरल्याशिवाय त्याची सुटका केली जाणार नाही, असे शहर पोलिस आयुक्‍तालयाने स्पष्ट केले आहे. (Action will be taken against unruly drivers after January 3 according to the new penalty)

परिवहन आयुक्‍तालयाने बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लावण्यासाठी आणि दरवर्षी रस्ते अपघात आणि अपघातातील (Accident) मृतांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलले आहे. पूर्वीच्या दंडाची रक्‍कम दुप्पट, अडीचपट केली असून नियम मोडल्यास जागेवरच दंड भरावा लागणार आहे. ई-चालानद्वारे कारवाई करूनही लाखो वाहनचालकांकडे दंडाची थकबाकी आहे. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दुसरीकडे रस्त्यावर स्थानिक वाहतूक पोलिस (Traffic Police), राष्ट्रीय महामार्ग पोलिस (National Highway Police) आणि शहरात आल्यानंतर वाहतूक पोलिसांकडूनही बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. समुपदेशन, जनजागृतीनंतरही वाहतूक नियम पाळत नसलेल्यांना नव्या आदेशानुसार वाढीव दंड भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे, दंडाची रक्‍कम जागेवरच भरावी लागणार असून ती न भरल्यास वाहन जप्त केले जाणार आहे.

वाहतूक दंड
तिसऱ्या लाटेची चाहूल! आठ जिल्ह्यात वाढले कोरोनाचे अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण

वाढीव दंड असा आहे...

  • मोबाईल टॉकिंग : 1000

  • मोठ्याने हॉर्न वाजवणे : 1000

  • नावाची नंबरप्लेट : 1000

  • दुसऱ्यांदा नियम मोडल्यास : 1500

  • पोलिस सूचना न पाळल्यास : 750

  • ट्रिपल सीट दुचाकी : 1000

  • पीयूसी नाही : 1000

  • चारचाकी वेगाने चालविणे : 2000

  • नोंदणीविना वाहन चालविणे : 10,000

  • वाहनाचा इन्शुरन्स नाही : 2000

  • विना हेल्मेट : 1000

पोलिस आयुक्‍तांचा अनोखा उपक्रम

परिवहन आयुक्‍तालयाने बेशिस्त वाहतूक करणाऱ्यांना स्वयंशिस्त लागावी, रस्ते अपघात कमी व्हावेत, या हेतूने दंडाची रक्‍कम वाढविली आहे. त्या नव्या दंडासह कारवाईला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, 28 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना पोलिस आयुक्‍तालयात आणून शिस्तीचे धडे दिले जाणार आहे. त्यांचे समुपदेशन केले जाणार असून त्यांच्याकडून एक रुपयाचाही दंड घेतला जाणार नाही. वाहतूक नियमांबद्दल जनजागृती करून नवा दंड आकारून कारवाई करण्याच्या हेतूने पोलिस आयुक्‍त (Police Commissioner) हरीश बैजल (Harish Baijal) यांनी 'नो चालान ड्राईव्ह' ही मोहीम सुरू केली आहे. या काळात बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागेल, असा विश्‍वास आहे.

वाहतूक दंड
सोलापूर : नऊ नगरपरिषदांवर प्रशासकाची नियुक्ती

ठळक बाबी...

  • 28 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत बेशिस्त वाहनांना दंड नाही; 3 जानेवारीनंतर वाढीव दंडानुसार वसुली

  • बेशिस्त वाहनचालकांना पोलिस वाहनातून मुख्यालयात त्यांचे समुपदेशन केले जाणार

  • कोणता वाहतूक नियम मोडल्यावर किती दंड, कोणती शिक्षा होईल, याची माहिती दिली जाणार

  • 3 जानेवारीनंतर रोखीने किंवा ऑनलाइन दंड जागेवरच भरावा लागणार, अन्यथा गाडी जप्त होणार

  • रस्त्यांवरील अस्ताव्यस्त रिक्षा व अन्य वाहनांवरही कारवाई केली जाणार

  • क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, ड्रेसकोड न वापरल्यास, विनापरमिट रिक्षा चालविल्यास होईल कारवाई

  • कोरोना नियमांचे सर्वांनी पालन करणे बंधनकारक; नियमभंग केल्यास जागेवरच भरावा लागणार दंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com