
मंगळवेढा : वैभवशाली इतिहासाचा अभिमान असायला हवा; परंतु इतिहासातील मढी उकरून काढून त्यातून हाती काय लागणार, हे तपासलं पाहिजे. कारण एकीकडं देश भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार, गुन्हेगारी, जातीयवाद अशा प्रश्नांनी जळत असताना दुसरीकडे असे माथी भडकविणारे विषय उकरून हेतुपुरस्सर जनतेचे लक्ष भटकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केले.