
करमाळा : श्री आजिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या दिवशी २७२ पैकी २०४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. आता २१ जागेसाठी ६२ उमेदवार उमेदवारी रिंगणात राहिले आहेत. ही निवडणूक तिरंगी होत आहे. आमदार नारायण पाटील, माजी संजयमामा शिंदे, प्रा. रामदास झोळ हे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीतून माजी आमदार जयवंतराव जगताप गट व बागल गटाने माघारी घेतली आहे.