'सकाळ'च्या बातमीनंतर पंढरपुरातील भिकाऱ्यांना मिळाले अन्नपाणी 

After the news of sakal beggars in pandharpur received food and water
After the news of sakal beggars in pandharpur received food and water
Updated on

पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर शहरातील भिकाऱ्यांना सोमवारी (ता. 23) येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने मोफत अन्नदान आणि पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. दिवसभरात सुमारे 300 हून अधिक गरजू वृद्ध व निराश्रित लोकांना फूड पॅकेटचे वाटप मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते करण्यात आले. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने 17 मार्चपासून येथील विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे. त्यामुळे पंढरीत येणाऱ्या भाविकांची संख्या ठप्प झाली आहे. त्यामुळे येथील भिक्षुकऱ्यांचीही उपासमार सुरू झाली होती. 
रविवारी (ता. 22) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला होता. दरम्यान, बंदमुळे शहरात भिक्षेसाठी फिरणाऱ्या सुमारे 200हून अधिक भिकाऱ्यांची उपासमार झाली. "पंढरपुरातील भिकाऱ्यांची उपासमार' या मथळ्याखाली सोमवारीच ऑनलाइन "सकाळ'मध्ये आणि सोमवारच्या (ता. 23) "सकाळ'मध्ये सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल पंढरपूरचे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले आणि विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी पुढील काही दिवस शहरात अन्न आणि पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या भिकाऱ्यांना मंदिर समितीच्या वतीने फूड पॅकेट आणि पाणी बॉटल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

crime
Mangalwedha Water Crisis Deepens As Shirnandgi Lake Dries Up And 11 Transformers Lose Power Affecting Farm Crops
Solapur Zilla Parishad Audit Flags 2 Point 13 Crore Rent Paid To 37 Ashram Schools Over Additional Space Claims
solapur district court
Marathi News Esakal
www.esakal.com