डोक्‍याला हात लावून बसण्याची आली शेतकऱ्यांवर वेळ ! कारण, आता उसापाठोपाठ "याला'ही झालाय हुमणीचा प्रादुर्भाव 

Humani
Humani
Updated on

मोहोळ (सोलापूर) : शेतकऱ्यामागची संकटांची मालिका संपता संपेना. उत्पादित शेतमालाचे तसेच पालेभाज्या व फळभाज्यांचे दर कोसळले आहेत. उत्पादित केलेला माल बाजारपेठा बंद असल्याने विकता येईना, त्यामुळे शेतकरी आता सीताफळ, पेरू यांसारख्या बागा लागवडीकडे वळला आहे. मात्र, आता लागवड केलेल्या पेरूच्या बागेलाही हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने डोक्‍याला हात लावून बसण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. 

शिरापूर (ता. मोहोळ) येथील संतोष व लक्ष्मण शिवाजी शिंदे या सख्ख्या भावांनी पेरू बागेची लागवड केली आहे. इतर डाळिंब, द्राक्ष यांसारख्या खर्चिक बागा करण्याची अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाही, त्यामुळे सीताफळ, पेरू यांसारख्या कमी खर्चाच्या बागा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे. शिंदे या शेतकऱ्याने पेरू लागवडी अगोदर जमिनीत शेणखत घातले आहे. लागवड केल्यानंतर काही दिवसांनी अंतर मशागती वेळी अनेक हुमणीच्या अळ्या जमिनीतून वर येऊ लागल्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दररोज सुमारे पाच ते सहा पाट्या हुमणीच्या अळ्या वेचल्या तरीही त्या कमी होईनात. लागवड केलेल्या पेरूच्या रोपांची मुळे हुमण्या कुरतडू लागल्याने रोपे जळून चालली आहेत. शिंदे हे नवीन शेतकरी आहेत. अनेक नव्या शेतकऱ्यांना अशा संकटाशी सामना करावा लागत आहे. कृषी विभागाने तातडीने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. 

याबाबत शिरापूरचे शेतकरी लक्ष्मण शिंदे म्हणाले, आम्ही एक एकर जमिनीवर पेरूची लागवड केली आहे. मात्र पेरूच्या रोपाला हुमणी लागली आहे. आटोक्‍यात येता येईना. दररोज घरातील सर्व सदस्य हुमणी वेचण्याचे काम करतात. या अनाहुत संकटाने माझ्यासारख्या शेतकऱ्याचे खच्चीकरण झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur traffic police
Gold Theft
solapur zp
Minor Harassment Allegations: POCSO Case Filed Against Doctor's Son-in-Law in Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com