"सोलापूर शहर नव्हे खड्डापूर शहर !' संभाजी ब्रिगेडने केले खड्ड्यात फलक लावून आंदोलन 

Khaddapur
Khaddapur
Updated on

सोलापूर : शहरामध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य ढिसाळ कारभारामुळे एकाच वेळी सर्वच ठिकाणी रस्ता खोदाईचे काम सुरू आहे. चांगल्या रस्त्यांचीही वाट लागलेली आहे. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांना व बाहेरून आलेल्या नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. स्मार्ट सिटीत समावेश असणारे सोलापूर शहर हे खड्ड्यांचे शहर म्हणून नवीन ओळख होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सोलापूर हे स्मार्ट सिटी आहे का खड्ड्यांची सिटी आहे, अशी परगावच्या लोकांची धारणा होईल. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात "सोलापूर शहर नव्हे तर खड्डापूर शहर' असा फलक लावण्यात आला.

"महानगरपालिकेला सुबुद्धी यावी व लवकरात लवकर हे शहर खड्डेमुक्त होऊन चांगले रस्ते व्हावेत' यासाठी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्‍याम कदम व जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

सोलापूर शहरात ड्रेनेज व जलवाहिनी टाकण्याची कामे एकाच वेळी सुरू आहेत. शहरातील सर्वच रस्त्यांवर व सर्वाधिक भागांमध्ये रस्त्यांची खोदाई केलेली आहे. अनेक ठिकाणी तीन ते चार फुटांचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा प्रश्‍न अधिकच बिकट बनला आहे. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. या रस्त्यांवर चारचाकी वाहने तर सोडाच पण अगदी दुचाकी चालवताही येत नाही. दुचाकींची संख्या वाढली, तर पादचाऱ्यांना पायी जाण्यासाठी रस्ता राहात नाही. अनेकवेळा काही भागांमध्ये सायंकाळनंतर पथदिव्यांचा प्रकाश कमी असतो. छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोबाईल गल्ली, नवी पेठ, फौजदार चावडी, चाटी गल्ली, मधला मारुती, भांडे गल्ली व हद्दवाढ आदी भागांमधील सर्व रस्ते खोदकामामध्ये अडकले आहेत. 

खड्डेमय रस्त्यांवर वाहन चालवल्याने मान आणि मणक्‍याचे दुखणे सुरू होते. वृद्धांना कंबर दुखण्याचा त्रास होतो. तसेच वाहनांचेसुद्धा नुकसान होते. अधिक धूळ तयार होऊन श्वसनाचे व डोळ्याचे आजार निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

काही भागात चांगले असलेले रस्तेही खोदण्यात आले आहेत. काम झाले तरी नवीन रस्ते न करता मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात आले आहेत. सोलापूर शहरातील रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवून चांगल्या दर्जाचे रस्ते करावेत; अन्यथा संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. 

या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, नागेश पवार, उपशहरप्रमुख आशुतोष माने, सीताराम बाबर, सोमनाथ पात्रे, सचिव सनी पाटू, राहुल घोडके, महेश तेल्लूर, विजय क्षीरसागर, मेऊल बुरे, इलियास शेख, शाहरुख पटेल, रमेश तरंगे, अक्षय साळुंखे, विनोद झळके, अक्षय जाधव आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Phaltan Pandharpur railway project land acquisition
Inspiring Cycling Journey Of Dattatray Gaikwad Who Cycles 1500 Km Monthly And Visits Pilgrimage Sites Across Maharashtra
Aherwadi Crime News Young Man Sachin Killed At 24 Over Alleged Illicit Relationship Suspicion Relatives Face Murder Case
Solapur Salary Dispute Turns Tragic As Worker Dies By Suicide After Alleged Assault And Insult Over 600 Rupees
Marathi News Esakal
www.esakal.com