APMC Election: बाजार समितीवर आवताडेंचे दुसऱ्यांदा वर्चस्व; १३ बिनविरोध तर निवडणुकीतून 5 जागा जिंकल्या

सर्व १८ जागा जिंकून बाजार समितीत आवताडेच अखेर ‘बॉस’ ठरले
APMC Election
APMC ElectionEsakal

मंगळवेढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी बबनराव आवताडे व आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. संस्था मतदारसंघात राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षांना अवघी दोन मते पडल्याने त्यांचा दारुण पराभव झाला. सर्व १८ जागा जिंकून बाजार समितीत आवताडेच अखेर ‘बॉस’ ठरले.

१८ जागा असलेल्या बाजार समितीमध्ये १३ जागा यापूर्वीच आवताडे चुलते- पुतण्यांनी एकत्र येत बिनविरोध केल्या. पाच जागांमध्ये संस्था मतदारसंघातील दोन व ग्रामपंचायतमधील तीन अशा पाच जागांसाठी ९ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यामध्ये होते.

आज सलगर बु, भोसे, मंगळवेढा या तीन मतदान केंद्रांवर जवळपास ९२ टक्के मतदान झाले. मतदानानंतर इंग्लिश स्कूलमध्ये मतमोजणी घेण्यात आली. संस्था मतदारसंघामध्ये ९२४ पैकी ८०० मतदान झाले. त्यापैकी चार मते बाद झाली. संगीता कट्टे यांना अवघी दोन तर कविता बेदरे, सविता यादव यांना प्रत्येकी ७९४ इतकी मते पडली.

ग्रामपंचायतमध्ये एकूण ५६५ मतदान झाले होते. त्यामध्ये जगन्नाथ रेवे ४३६, गंगाधर काकणकी ४४१ व सोमनाथ माळी यांना १०१ इतकी मते पडली. या प्रवर्गात सोमनाथ माळी यांचा पराभव झाला तर ग्रामपंचायत विभागातील एका राखीव जागेसाठी पांडुरंग कांबळे ४२०, हौसाप्पा शेवडे ८२ व वैभव सोनवणे यांना फक्त एक मत पडले. या प्रवर्गात पांडुरंग कांबळे हे विजयी झाले. पाच जागांसाठीच्या मतदानामध्ये पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.

APMC Election
Bacchu Kadu: 'बच्चू कडू यांचं सदस्यत्व रद्द करावं', ठाकरे गटाच्या आमदाराची मागणी

बाजार समितीच्या गत निवडणुकीत देखील आवताडे गटाने १८ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. यंदाच्या निवडणुकीत १३ जागा यापूर्वीच बिनविरोध केल्या व निवडणुकीतून पाच अशा १८ जागा जिंकून सहकारी संस्थेत आवताडे यांचे प्राबल्य कायम राहिले. आवताडे कुटुंबाशी प्रामाणिक राहिलेल्या अनेक समर्थकांना या संस्थेत संचालक पदाची संधी मिळाली.

‘दामाजी’नंतर दुसरी मोठी सहकारी संस्था ताब्यात घेण्याचा ‘समविचारी’ने प्रयत्न केला; परंतु पुरेसे मतदार नसल्यामुळे त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या या सहकारी संस्थेवर मतमोजणीनंतर वर्चस्व अबाधित राहिल्याबद्दल आवताडे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

APMC Election
Pune News: पुण्यात भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, कार्यालयात पंख्याला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com