esakal | विद्यापीठात उभारणार अहिल्यादेवींचा 15 फुटी अश्‍वारूढ पुतळा ! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

अहिल्यादेवी होळकर

स्मारक परिसरात अहिल्यादेवींच्या कार्यावर आधारित विविध प्रकारचे शिल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच अ‍ॅम्फी थिएटर, गार्डन, परिसर सुशोभीकरणासाठी अंदाजित साडेपाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

विद्यापीठात उभारणार अहिल्यादेवींचा 15 फुटी अश्‍वारूढ पुतळा !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात (Punyashlok Ahilya Devi Holkar Solapur University) अहिल्यादेवींचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharane) यांनी घेतला. 15 फूट उंचीचे हे स्मारक ब्रॉंझ धातूने बनविले जाणार आहे. त्यासाठी एक कोटी 90 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तर उर्वरित कामांसाठी चार कोटींपर्यंत खर्च होईल, अशी माहिती पालकमंत्री भरणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (Ahilya Devi Holakar's equestrian statue to be erected at Solapur University)

हेही वाचा: अकरावी प्रवेशासाठी द्यावी लागणार सीईटी परीक्षा !

सोलापूर विद्यापीठाचे नामांतर झाल्यानंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी, या हेतूने त्या ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला. त्यानुसार त्यांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती नियुक्‍त केली. या समितीची आज (शुक्रवारी) ऑनलाइन बैठक पार पडली. या वेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, समितीचे सदस्य चेतन नरोटे, सारिका पिसे, बाळासाहेब शेळके, बाळासाहेब बंडगर, अस्मिता गायकवाड आदी उपस्थित होते. तर आमदार रोहित पवार यांनीही या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

हेही वाचा: डॉक्‍टर म्हणाले, आजी दोन दिवसांपेक्षा जास्त जगू शकणार नाही ! पण आजीने...

विद्यापीठात स्मारकाच्या परिसरात अहिल्यादेवींच्या कार्यावर आधारित विविध प्रकारचे शिल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच अ‍ॅम्फी थिएटर, गार्डन, परिसर सुशोभीकरणासाठी अंदाजित साडेपाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असेही पालकमंत्री भरणे यांनी या वेळी स्पष्ट केले. अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील जनतेने अहिल्यादेवींच्या स्मारकाची मागणी केली होती. आता ती मागणी पूर्ण होईल, असेही पालकमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अश्‍वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. तर तो परिसर सुशोभीत केला जणार आहे. या कामासाठी एकूण साडेपाच कोटींपर्यंत खर्च अपेक्षित आहे. त्याचा कृती आराखडा (प्लॅन इस्टिमेट) तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यापीठाला दिले. कृती आराखडा अंतिम झाल्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून आगामी काळात त्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून, त्या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य मंत्र्यांचीही उपस्थिती असेल, अशी चर्चा आहे.

loading image
go to top