Solapur News : अहिल्यादेवी होळकर यांचे सोलापुरात स्मारक! २१ फुटांची मूर्ती, बारव, दीपमाळ; ऑगस्ट महिन्यामध्ये होणार लोकार्पण
मंत्रिमंडळाच्या ६ मार्च २०१९ रोजीच्या बैठकीत सोलापूर विद्यापीठाचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याचा निर्णय झाला.
सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन जागेत प्रशासकीय इमारत, परीक्षा भवन बांधले जात आहे. या इमारतीसमोर शिवलिंग हाती घेतलेल्या राजमाता अहिल्यादेवींचे २१ फुटी स्मारक उभारण्यात आले आहे.